दादर - बहुप्रतिक्षेत असलेल्या इंदु मिलच्या जागेवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय स्मारकाच्या कामाच्या पहिल्या टप्प्याच्या कामाला शुक्रवारपासून सुरुवात झालीय. प्रकाश भांगरे, नितीन कांबळे, अरविंद धावे, सत्यजीत साळवे या एमएमआरडीएच्या अधिका-यांची टिम हे कामकाज पाहणार आहे. स्मारकाच्या कामाचा पहिला टप्पा तब्बल 3 महिने सुरु राहणार आहे. या 3 महिन्याच्या कालावधीत इंदू मिल पूर्णपणे पाडण्यात येणार आहे. या स्मारकाचे पूर्ण काम एमएमआरडीएला देण्यात आले असून, मिलमध्ये अनेक वेगवेगळी झाडे आहेत. बांधकाम करत असताना जास्तीत जास्त झाडे वाचवण्याचा प्रयत्न एमएमआरडी करणार आहे. त्याचबरोबर इंदू मिलमध्ये असलेला गोड्या पाण्याचा तलाव स्मारक कितीही भव्य असले तरीही तो ठेवण्यात येणार आहे. सध्या या तलावात कच-यामुळे पाणी दुषित झालंय. त्यामुळे हे पाणी प्रक्रिया करुन स्वच्छ करण्यात येणार आहे.