मुंबईत प्रादेशिक तत्वावर सुरू करण्यात आलेली ‘नाईट लाईफ’ (Nightlife) ही कोणाची मागणी नसून फक्त चिरंजीवांचा हट्ट पूरवण्याचे काम असल्याची टिका माजी मुख्यमंत्री नारायण राणे (Former Chief Minister Narayan Rane) यांनी केली आहे. राज्यात अनेक प्रश्न अद्याप प्रलंबित असून मुलाचे असे हट्ट पुरवण्याऐवजी मुख्यमंत्र्यांनी त्या प्रश्नांकडे लक्ष द्यावे, असा टोलाही राणेंनी यावेळी मुख्यमंत्री (Chif minister) उद्धव ठाकरे (Udhhav Thackeray) यांना लगावला.
हेही वाचाः-अदनान सामी यांना पद्मश्री देण्यास मनसेचा विरोध
हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे माझे गुरु आहेत. मी त्यांच्या तालमीत तयार झालो आहे. मात्र साहेबांचा एक ही गुण उद्धव ठाकरे यांच्यात दिसून येत नाही. उद्धव ठाकरे हे अनुभव शून्य आहेत. पक्षाच्या विचारणी विरोधात ठाकरे निर्णय घेत असल्याने शिवसेना ही आता पूर्वीसारखी राहिलेली नाही. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्याने राज्य अधोगतीला जाईल, असं वक्तव्यही नारायण राणे यांनी केलं आहे. ते पुण्यातील सॅटर्डे क्लबमध्ये बोलत होते. देवेंद्र फडणवीस ५ वर्ष मुख्यमंत्री पदावर राहिले. यंदा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होतील असं कधीही वाटलं नव्हतं. परंतु, आता उद्धव ठाकरेंनी राज्याच्या मुख्यमंत्री पदाचा मान ठेवावा, असंही नारायण राणे यावेळी म्हणाले.
हेही वाचा ः-मुंबईतील हा अवलिया चालवतोय 'सलून वाचनालय'
या कार्यक्रमाला खासदार गिरीश बापट, मोहन जोशी, घटनातज्ज्ञ उल्हास बापट, पुणे मनपा आयुक्त शेखर गायकवाड, सहकार आयुक्त अनिल कवडे यांच्यासह अनेक अधिकारी आणि राजकीय पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी राणे यांनी बाळासाहेबांसोबतच्या आठवणींना उजाळा दिला. तसेच उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री पदावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तसेच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर स्तुतीसुमने उधळली.