केंद्र सरकारने संसदेच्या विशेष अधिवेशनाची घोषणा केली आहे. या अधिवेशनाची तारीख जस जशी जवळ येत आहे तसं राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा घडताना दिसत आहेत. या विशेष अधिवेशनात नेमकं काय घडणार याची अद्याप कुणालाही कल्पना नाही.
सरकार एक देश एक निवडणुक अजेंडा राबवण्याच्या तयारीत असल्याच्या देखील चर्चा आहेत.
आता विरोधी पक्षाकडून करण्यात आलेल्या एका नव्या दाव्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी ट्विट करत हा दावा केला आहे.
So the news is indeed true.
— Jairam Ramesh (@Jairam_Ramesh) September 5, 2023
Rashtrapati Bhawan has sent out an invite for a G20 dinner on Sept 9th in the name of 'President of Bharat' instead of the usual 'President of India'.
Now, Article 1 in the Constitution can read: “Bharat, that was India, shall be a Union of States.”…
त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, जी-२० परिषदेसाठी ज्यांना डिनरसाठी निमंत्रित केलं आहे. ज्यात प्रेसिडेंट ऑफ इंडिया ऐवजी प्रसिडेंट ऑफ भारत असा उल्लेख करण्यात आला आहे. हे खरच असून राष्ट्रपती भवनात ९ सप्टेंबररोडी जी-२० संमेलनाच्या डिनरसाठी निमंत्रक पत्रिका पाठवली आहे. त्यात प्रेसिडेंट ऑफ इंडियाच्या जागी प्रेसिडेंट ऑफ भारत असा उल्लेख करण्यात आला आहे. संविधानाचे कलम १ वाचल्यास त्यात भारत जो इंडिया आहे एक राज्यांचा संघ असले. आता संघराज्याला धोका निर्माण झाला असल्याचा आरोप जयराम रमेश यांनी केला आहे.
१८ ते २२ सप्टेंबर या काळात केंद्राने संसंदेचं विशेष अधिवेशन बोलावलं आहरे. या अधिवेशनाचा कुठलाही निश्चित अजेंडा अद्याप समोर आलेला नाही. यामुळे याविषयी तर्क वितर्क लढवले जात आहेत. संविधानात ज्या ज्या ठिकाणी इंडिया शब्दांचा वापर आहे. तिथे भारत केले जाणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे.
काही दिवसांपूर्वी राज्यसभा खासदार हरनाथ सिंह यांनी इंडिया हे नाव गुलामीचं प्रतिक असून संविधानात भारत या शब्दाचा उल्लेख करायला हवा. संसंदेच्या पावसाळी अधिवेशनात देखील काही लोकांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. त्यामुळे संसंदेच्या विशेष अधिवेशनात यावर काही विधेयक आणलं जात का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
हेही वाचा