Advertisement

मालाडमधील समस्यांचा आढावा


मालाडमधील समस्यांचा आढावा
SHARES

मालाड - गेल्या काही वर्षांपासून मालाड परिसरातील नागरिकांना अनेक नागरी समस्या भेडसावत आहे. याच आढावा घेण्यासाठी उत्तर मुंबई लोकसभा क्षेत्राचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी पी उत्तर पालिका विभाग आणि म्हाडा यांची शुक्रवारी संयुक्त बैठक घेतली. मालाडमधील अरुंद रस्ते, वाढती वाहतुक कोंडी, कमल तलावाचे सौंदर्यकरण, रस्त्यावरील अतिक्रमण, एमएचबी कॉलनीतील रहिवाशांना अपुरा पाणी पुरवठा या नागरी विषयांवर चर्चा करण्यात आली.

खासदार गोपाळ शेट्टी, नगरसेवक राम बारोट, प्रभाग समिती अध्यक्ष ज्ञानमूर्ती शर्मा, उत्तर मुंबई जिल्हयाचे भाजप मंत्री जॉन डेनिस, पी उत्तर पालिका सहायक आयुक्त संगीता हसनाळे, पालिका आणि म्हाडाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. जानेवारी 2017 पर्यंत मालाडमधील रस्त्यांचे रुंदणीकरण आणि नुतणीकरण करण्याचे काम सुरु करण्यात येईल असे आश्वासन यावेळी हसनाले यांनी दिल्याचे भाजपचे उत्तर जिल्ह्याचे मंत्री जॉन डेनिस यांनी सांगितले.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा