Advertisement

Maharashtra Political Saga: उद्धव ठाकरेंसाठी ‘शिवाजी पार्क’वरील दसरा मेळावा महत्त्वाचा का आहे?

पण शिवसेनेसाठी शिवाजी पार्क इतका महत्त्वाचा का आहे? हेच आपण काही मुद्द्यांमधून जाणून घेऊयात.

Maharashtra Political Saga: उद्धव ठाकरेंसाठी ‘शिवाजी पार्क’वरील दसरा मेळावा महत्त्वाचा का आहे?
SHARES

सर्वोच्च न्यायालयानं नुकतीच शिवतीर्थावर शिवसेनेचाच (Shiv Sena) दसरा मेळावा होणार असा निर्णय दिला. एकनाथ शिंदे गटाने (Eknath Shinde) उद्धव ठाकरेंविरोधात बंड केला. त्यानंतरचा हा पहिलाच दसरा मेळावा. शिंदे गटाने देखील दसरा मेळावा शिवतीर्थावर घेण्यासाठी पालिकेला अर्ज करत शिवसेनेची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. पालिकेनं (BMC) शिवसेना आणि शिंदे गट दोघांचे अर्ज फेटाळले. अखेर शिवसेनेने कोर्टात धाव घेतली. कोर्टानं देखील शिवसेनेच्या बाजूनं निकाल दिला.

पण शिवसेनेसाठी शिवाजी पार्क (Shivaji Park) इतका महत्त्वाचा का आहे? हेच आपण काही मुद्द्यांमधून जाणून घेऊयात.

शिवसेना म्हटलं की मुंबईकराच्या (Mumbaikar) डोळ्यांसमोर दोन गोष्टी नक्की येतात... शिवसेना भवन आणि दसऱ्याला शिवसैनिकांनी खचाखच भरलेल्या शिवतीर्थावर - शिवाजी पार्कात भाषणासाठी कमरेवर हात ठेऊन उभे असलेले बाळासाहेब.

शिवसेनेच्या स्थापनेपासून ते पक्षासाठी महत्त्वाच्या ठरलेल्या प्रत्येक घटनेला शिवाजी पार्क साक्षीदार आहे. म्हणून ठाकरे कुटुंबातील चारही पिढ्यांसाठी शिवाजी पार्क प्रतिष्ठेचे मानले जाते.

शिवसेनेचा साक्षीदार शिवाजी पार्क

१९ जून १९६६ रोजी शिवसेनेची स्थापना झाली. स्थापना झाल्यानंतर बऱ्याच काळानंतर बाळासाहेबांनी पक्षाची पहिली जाहीर सभा घेण्याचं ठरवलं. यासाठी दसऱ्याची निवड करण्यात आली कारण त्यादिवशी सार्वजनिक सुट्टी असते. ठरल्यानुसार ३० ऑक्टोबर १९६६ ला दसरा मेळावा झाला. तेव्हापासून शिवसेनेची ही दसरा मेळाव्याची परंपरा कायम आहे.

शिवतीर्थावरच घेतले महत्त्वाचे निर्णय

  • इंदिरा गांधींनी देशात जाहीर केलेल्या आणीबाणीला त्यांनी 1975मध्ये पाठिंबा जाहीर केला
  • 1985मध्ये शिवसेनेची हिंदुत्वाविषयीची भूमिकाही त्यांनी याच मैदानातून जाहीर केली होती.
  • 1989 च्या दसरा मेळाव्यात, शिवसेना प्रमुखांनी काँग्रेसला पाठींबा नसल्याचे जाहीर केलेले.
  • 1991 च्या दसऱ्या मेळाव्यात बाळासाहेबांनी आपल्या भाषणात जाहीर केले की, भारताचा पाकिस्तानशी नियोजित क्रिकेट सामना मुंबईत होऊ देणार नाही. त्यानंतर शिवसैनिकांनी वानखेडे स्टेडियमवर घुसून वानखडे स्टेडियम फोडलं, ग्राउंडचं नुकसान केले, त्यामुळे सामना रद्द करावा लागला होता.
  • २०१० च्या दसरा मेळाव्यात, बाळासाहेबांनी आदित्य ठाकरेंना ऑफिशियली राजकारणात लॉन्च केले.
  • त्यानंतर २०१२ चा दसरा मेळावा बाळासाहेबांचा शेवटचा मेळावा ठरला होता. बाळासाहेबांची प्रकृती खालावल्यामुळे ते या मेळाव्यात येउ शकले नव्हते पण त्यांचं रेकॉर्डेड भाषण लावण्यात आलले.
  • शेवटच्या भाषणात त्यांनी म्हटलं होतं की, “मला सांभाळलंत तसंच माझ्या उद्धवला सांभाळा, आदित्यला सांभाळा आणि महाराष्ट्राचा उत्कर्ष करून घ्या” अशी भावनिक साद घातली होती.

बाळासाहेबांचे स्मृतीस्थळ

स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे अंतिमसंस्कार करण्यात आले, त्याच शिवाजी पार्कच्या एका भागामध्ये आज त्यांचं स्मृतीस्थळ आहे. याच ठिकाणी उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.

बाळासाहेबांच्या पत्नी - मीनाताई ठाकरे, ज्यांना 'मां' म्हटलं जायचं त्यांचाही पुतळा या शिवाजी पार्कच्या प्रवेशद्वारापाशी आहे.

शिवाजी पार्कपासून अगदी जवळ असणाऱ्या महापौर बंगल्यामध्ये आता शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं स्मारक होणार आहे.

मैदानाला लाभलेला राजकीय इतिहास

शिवसेनेच्या आधीही हे स्थळ राजकीय अर्थाने आधीच चर्चेत असणारं होतं. १९५० च्या संयुक्त महाराष्ट्र चळवळीदरम्यान मराठी भाषिक राज्याची मागणी करणाऱ्या आंदोलनासाठी शिवाजी पार्क हे महत्त्वाचे ठिकाण होते. शिवाजी पार्कवर अनेक मोर्चे काढले गेले ज्यात प्रबोधनकार ठाकरे देखील सामील होते.



हेही वाचा

सत्तांतर होताच आरक्षणाच्या विषयाची खाज का?, तानाजी सावंतांची जीभ घसरली

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा