INS विक्रांतप्रकरणी किरीट सोमय्यांचे पुत्र नील सोमय्या यांनादेखील मोठा दिलासा मिळाला आहे. अटकपूर्व जामिनासाठी सोमय्या पिता-पुत्रांनी उच्च न्यायालयात याचिका केली होती. किरीट सोमय्यांना यापूर्वीच उच्च न्यायालयानं अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.
INS विक्रांतप्रकरणी मुंबई पोलिसांनी तुर्तास नील सोमय्या यांच्यावर कारवाई करू नये, असे आदेश उच्च न्यायालयानं मुंबई पोलिसांना दिले आहेत. त्यामुळे अटकेपासून आता नील सोमय्या यांनादेखील दिलासा मिळाला आहे. मात्र, न्यायालयानं नील सोमय्या यांना तपासात पोलिसांना पुर्ण सहकार्य करण्याचे आदेशही दिले आहेत.
(सविस्तर वृत्त लवकरच)
हेही वाचा