वांद्रे - वांद्रे पू्र्व समाज मंदिर हॉल येथे खासदार रामदास आठवले फाउंडेशनचा उद्घाटन सोहळा पार पडला. या सोहळ्यासाठी मुख्य अतिथी म्हणून रिपाई अध्यक्ष रामदास आठवले होते. यावेळी आठवले यांनी ट्रस्टचे उद्घाटन केले. या उद्घाटन समारंभाला स्थानिक नगरसेवक आणि ट्रस्टचे अध्यक्ष भगवान किशन इगवे, किशोर इगवे,ईश्वर ढूढे आणि राहुल इगवे उपस्थित होते.