Advertisement

अजित पवार यांनी घेतलेला निर्णय पक्ष धोरणाच्या विरोधातला – शरद पवार

अजित पवारांसोबत जाणीवपूर्वक जाणाऱ्यांवर पक्षांतर्गत कारवाई केली जाईल, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

अजित पवार यांनी घेतलेला निर्णय पक्ष धोरणाच्या विरोधातला – शरद पवार
SHARES

पक्षा विरोधात जाऊन सदस्यांची दिशाभूल करत अजित पवार भाजपला पाठींबा देतील असे कधी वाटलं नव्हतं. अजित पवार यांनी घेतलेला निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसच्या धोरणाविरोधातला आहे, अजित पवारांसोबत जाणीवपूर्वक जाणाऱ्यांवर पक्षांतर्गत कारवाई केली जाईल, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. यशवंतराव चव्हाण सेंटर या ठिकाणी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हे वक्तव्य केलं. महाराष्ट्रात जनमत जे आहे ते भाजपाच्या विरोधात आहे. असं असताना त्यांच्यासोबत जाण्याच्या निर्णयाला जनता पूर्ण विरोध दर्शवेल असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.

महाराष्ट्रासह देशात भाजपविरोधात नागरिकांमध्ये नाराजी आहे. महाराष्ट्रात सक्षम सरकार बनावं यासाठीच शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे तिन्ही पक्ष एकत्र आले होते. मात्र अजित पवारांनी १० ते ११ सदस्यांची दिशाभूल करत शनिवारी सकाळी ६.वा. सुमारास राजभवनात भाजपला पाठींबा देत, उपमुख्यमंत्रीपदाची शपत घेत राजकिय भूकंप केला. याबाबत पक्षप्रमुख शरद पवार आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव यांनी वाय.बी.चव्हाण येथे पत्रकार परिषद घेतली.  त्यावेळी शरद पवारांनी अजित पवारांसोबत जाणाऱ्या सदस्यांना पक्षांतर्गत बंदीची आठवण करून दिली.  ‘जे अपात्र होतील त्यांच्याविरोधात आम्ही तीन पक्ष काय करायचं ते करु असंही पवार यांनी सांगितलं.

देशात पक्षांतर बंदीचा कायदा करण्यात आला आहे हे अनेकांना माहित नसावं. त्यामुळे नंतर जी कारवाई होईल त्यासाठी आम्ही योग्य ती कारवाई करु’. तसेच भाजपाला बहुमत सिद्ध करता येणार नाही. त्यानंतर आम्ही सरकार स्थापन करु असंही पवार यांनी म्हटलं आहे. आम्ही एकत्र होतो, आहोत आणि राहू असंही शरद पवार यांनी स्पष्ट केलं. राज्यात सत्तास्थापनेच्या दृष्टीने ज्या काही गोष्टी घडल्या त्यानंतर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा