Advertisement

26/11 च्या हल्ल्यांतील हुतात्म्यांना आदरांजली


26/11 च्या हल्ल्यांतील हुतात्म्यांना आदरांजली
SHARES

मुंबई - मुंबईच्या भेटीवर आलेले इस्रायलचे राष्ट्राध्यक्ष रुवेन रिवलीन यांनी 26/11 हल्ल्यात हुतात्म्य प्राप्त झालेल्या नागरिकांना आणि जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. तसंच ताज महल हॉटेलच्या कर्मचार्‍यांशी संवाद साधला.
इस्रायल सरकारतर्फे ताज महल हॉटेल येथील स्मृती कक्षात सोमवारी आयोजित केलेल्या या श्रद्धांजली सभेला राष्ट्राध्यक्षांच्या पत्नी नेचामा रिवलीन, राज्यपाल सी. विद्यासागर राव, राजशिष्टाचार मंत्री राम शिंदे, इस्रायलचे भारतातील राजदूत डेव्हिड कार्मोन आणि मुंबईतील वाणिज्य दूत डेव्हिड अकोव्ह हे उपस्थित होते. श्रद्धांजली सभेनंतर राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी राष्ट्राध्यक्ष रिवलीन यांची ताज महाल हॉटेलच्या इंपेरियल कक्षात सदिच्छा भेट घेऊन भारत आणि इस्रायल संबंधांवर चर्चा केली.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा