मुलुंड - मेहुल टॉकीजजवळ काँग्रेस कार्यकर्त्यांनी शुक्रवारी मूक मोर्चा काढत सत्ताधारी भाजपा विरोधात निषेध व्यक्त केलाय. महात्मा गांधींच्या छायाचित्रासमोर गांधीजींचा पेहराव परिधान केलेल्या लहान मुलाला उभे करून मूक प्रदर्शन करण्यात आले. "आजच्या काळात पुन्हा एकदा जणू गांधी हत्याच झाली आहे," अशी तीव्र भावना ईशान्य मुंबई काँग्रेस सरचिटणीस राजेश इंगळे यांनी व्यक्त केली आहे.