Advertisement

Video: आॅगस्ट क्रांती मैदानात एनआरसी, सीएए विरोधात एल्गार

मुंबईतील विविध पुरोगामी संघटनांनी ग्रँट रोड येथील आझाद क्रांती मैदानात सायंकाळी ४ वाजता मोर्चाचं आयोजन केलं. या मोर्चात पुरोगामी विचाराच्या कार्यकर्त्यांसोबत मोठ्या संख्येने तरूण-तरूणी, राजकीय नेते आणि सेलिब्रिटी सहभागी झाले.

Video: आॅगस्ट क्रांती मैदानात एनआरसी, सीएए विरोधात एल्गार
SHARES

भारतातील लोकशाही आणि धर्मनिरपेक्षतेवर घाला घालण्यासाठीच केंद्र सरकारनं सुधारीत नागरिकत्व कायदा (CAA) तसंच राष्ट्रीय नागरिक नोंदणी (NRC) आणल्याचा आरोप करत देशभरात आंदोलन करण्यात आली. याच पार्श्वभूमीवर मुंबईतील विविध पुरोगामी संघटनांनी ग्रँट रोड इथल्या आझाद क्रांती मैदानात सायंकाळी ४ वाजता मोर्चाचं आयोजन केलं होतं. या मोर्चात पुरोगामी विचाराच्या कार्यकर्त्यांसोबत मोठ्या संख्येनं तरूण-तरूणी, राजकीय नेते आणि सेलिब्रिटी सहभागी झाले होते.  


‘हा कायदा डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा अपमान आहे.’ ‘देख लेंगे जोर कितना तानाशाह के बिल में है,’ ‘हिंदुस्थान एक है, एकही रहेगा,’ असे विविध घोषणांचे फलक मोर्चात पाहायला मिळाले. शेकडो तरूण-तरूणी या मोर्चात सायंकाळी ४ वाजेपासून सहभागी झाले होते. या तरूणांनी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करून या कायद्याला विरोध दर्शवला. हा कायदा भारताच्या एकात्मतेच्या विरोधातील असल्यानं तो मागे घेण्यात यावा, अशी मोर्चेकऱ्यांची मागणी होती. 


या आंदोलनात सिने अभिनेते राहुल बोस, सुशांत सिंह, अभिनेत्री स्वरा भास्कर, दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश मेहरा, काँग्रेस नेते राज बब्बर, काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष एकनाथ गायकवाड, दिग्दर्शक अनुराग कश्यप, अभिनेत्री हुमा कुरेशी यांनीही भाग घेतला होता.






दरम्यान शेकडोच्या संख्येनं जमलेल्या मोर्चेकऱ्यांमुळे ग्रँट रोड परिसरात वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती. या मोर्चामुळे शहरात अफवा पसरून परिस्थिती चिघळू नये, कायदा सुव्यवस्थेत बिघाड होऊ नये म्हणून दक्षिण मुंबईतील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली.



हेही वाचा

आंदोलन, जाळपोळ, दंगली सरकारला हवंच आहे - राज ठाकरे

धग


Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा