दक्षिण मध्य मुंबईत काँग्रेस उमेदवार एकनाथ गायकवाड यांच्या तुलनेत शिवसेना उमेदवार राहुल शेवाळे यांचं पारडं जड मानलं जात आहे. राहुल शेवाळे यांनी प्रचारात घेतलेली आघाडी, त्यांचा जनसंपर्क, मतदारांकडून मिळणारा प्रतिसाद याकडे पाहता या मतदारसंघात शेवाळे पुन्हा एकदा शिवसेनेचा भगवा फडकावतील असं म्हटलं जात आहे.
शेवाळे यांच्या तुलनेत गायकवाड यांचा प्रचार तोकडा पडल्याचं दिसून आलं. एवढंच नाही, तर मागील काही वर्षांपासून गायकवाड यांचा जनसंपर्कही मर्यादीतच राहिलेला दिसून येतो. गायकवाड यांना स्वत:च्या पक्षातूनच विरोध असल्याने प्रचारादरम्यान त्यांना काँग्रेस कार्यकर्त्यांचं पाठबळ म्हणावं तसं मिळाल्याचं दिसलं नाही. गाडकवाडांच्या प्रचारात मनसे कार्यकर्त्यांचीही गर्दी दिसून आली. परंतु मनसेची मतं खासकरून मराठी मतं गायकवाडांना कितपत मिळतील हीच मोठी शंका आहे.
या मतदारसंघात एकूण ५५.२३ टक्के मतदान झालं. यापैकी सर्वाधिक मतदान वडाळ्यात झालं. तर सर्वात कमी मतदान धारावीत झालं आहे. धारावी आणि वडाळा हा गायकवाड यांचा गड मानला जातो, तर त्यापाठोपाठ मतदान माहीम आणि चेंबूरमध्ये झालं आहे. या विभागात शिवसेनेचं वर्चस्व आहे. याकडे पाहता शेवाळे या मतदारसंघात आघाडी घेतली, असं म्हटलं जात आहे.
मतदानाची विभागवार आकडेवारी पुढीलप्रमाणे: