दादर - मुंबईला शांघाय शहर बनवण्याच्या करारानुसार शांघायने काही महत्त्वाच्या क्षेत्रामध्ये मुंबईबरोबर सहकार्य केले. मात्र महापालिकेने गेल्या अडीच वर्षात प्रतिसाद दिलेला नाही. त्यामुले आधुनिक तंत्रज्ञान आणल्यास डम्पिंग ग्राऊंड नाहीसे होण्याची भीती वाटते का? असा प्रश्न भाजपाचे मुख्य प्रवक्ते माधव भांडारी यांनी उपस्थित केला. सोमवारी दादर पूर्व येथील वसंत स्मृती सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
कचरा व्यवस्थापन, सांडपाणी प्रक्रिया, वाहतूक व्यवस्थापन यामध्ये आधुनिक तंत्रज्ञान पुरवण्याची तयारी शांघाय शहर प्रशासनानं दाखवली होती. त्यानंतर मुंबई आणि शांघायचे महापौर यांच्यात करार झाला. त्यानुसार आयटी आणि पर्यटक या क्षेत्रांमध्ये मुंबईतील इतर कामं करण्याची तयारी शांघाय शहर प्रशासनानं दाखवली. मात्र मुंबई महानगरपालिकेकडून गेल्या अडीच वर्षात कोणताही प्रतिसाद शांघायला का देण्यात आलेला नाही? आधुनिक तंत्रज्ञान आणले तर डम्पिंग ग्राऊंड नाहीसे होतील का? असा प्रश्नही माधव भांडारी यांनी उपस्थित केला. याचे उत्तर महापालिकेत सत्ता असणाऱ्यांनी द्यावे असंही ते म्हणाले. तर महापालिका म्हणते 8 हजार मॅट्रिक टन कचरा रोज उचलला जातो. मात्र आजही मुंबईच्या कानाकोपऱ्यात हा कचरा पाहायला मिळतो, लाखो लीटर सांडपाणी रोज समुद्रात सोडून समुद्र दूषित करण्याचे काम महापालिका करते. पण त्यांना आधुनिक तंत्रज्ञान आणण्याची भीती वाटत असल्याची टीकाही भांडारींनी या वेळी केली.