Advertisement

विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनावर कोरोनाचं सावट

अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होण्यापूर्वी ३२ जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळाली आहे.

विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनावर कोरोनाचं सावट
SHARES

अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होण्यापूर्वी ३२ जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळाली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी ३२०० कोरोना चाचणी घेण्यात आल्या होत्या. त्यापैकी ३२ जण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये पोलिस कर्मचारी यांचा समावेश आहे. त्यात २ पत्रकार आणि पोलिस कर्मचारी यांचा समावेश आहे.

या व्यतिरिक्त विधीमंडळ, मंत्रालयातील कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याचं समजतंय. विधानभवन इथं केलेल्या कोरोना टेस्टमध्ये एकही आमदार पॉझिटीव्ह नसल्याची माहिती समोर आली आहे. बहुतेक आमदारांनी खासगी कोरोना टेस्ट केल्या आहेत. त्यामुळं संपूर्ण डाटा तूर्तास उपलब्ध नसल्याची माहिती विधान भवनाकडून मिळाली आहे.

अधिवेशनात २ वेळा होणार कोरोना चाचणी

विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशनात २ वेळा कोरोना चाचणी करावी लागणार असल्याची माहिती समोर येत आहे. यंदाचं विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन १० दिवस होणार आहे. अधिवेशन १० दिवस होत असल्यामुळं २ वेळा कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. ५ दिवस कामकाज पुन्हा एकदा कोरोना चाचणी होणार आहे. जेणेकरून या ५ दिवसात कोणी कोरोना बाधित झालं तर स्पष्ट व्हावं, यासाठी २ वेळा चाचणी करण्यात येणार आहे.

अर्थसंकल्पीय अधिवेशन १ ते १०  मार्च असं १० दिवस होत आहे. ८ मार्चला राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार असून, ९ आणि १० मार्चला बजेटवर चर्चा होणार आहे. त्यासाठी सोमवारी व बुधवारी चाचणी होणार आहे. ८ मार्च ते १० मार्च कामकाजसाठी ६ आणि ७ मार्च रोजी दुसरी कोरोना चाचणी होणार असल्याची माहिती मिळाली आहे. 

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा