प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीतील राजपथावर होणाऱ्या पथसंचलनात यंदा महाराष्ट्राचा चित्ररथ दिसणार नाही. गृहमंत्रालय आणि संरक्षण मंत्रालयानं महाराष्ट्राच्या चित्ररथाला परवानगी नाकारल्याने चित्ररथ साकारणाऱ्या कलाकारांमध्ये निराशा पसरली आहे. तर दुसऱ्या बाजूला केंद्र सरकारने सूडबुद्धीने परवानगी नाकारल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे.
हेही वाचा- ‘ती’ अनलकी केबिन एकाही मंत्र्याने का नाही घेतली?
दरवर्षी २६ जानेवारी रोजी दिल्लीतील राजपथावर प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येतं. यावेळी होणाऱ्या पथसंचलनात निवडक राज्यांचे चित्ररथ सहभागी होतात. मागील ५ वर्षांमध्ये दोनदा महाराष्ट्राच्या चित्ररथाने सर्वोत्कृष्ट सादरीकरणाचा पुरस्कार पटकावला आहे. यावर्षी मराठी रंगभूमीची १७५ वर्षे या संकल्पनेवर चित्ररथ साकारण्यात येणार होता. परंतु केंद्रीय गृहमंत्रालय आणि संरक्षण मंत्रालयानं परवानगी नाकारल्याने यंदा महाराष्ट्राचा चित्ररथ पथसंचलनात सहभागी होणार नाही.
हेही वाचा- ‘ती’ अनलकी केबिन एकाही मंत्र्याने का नाही घेतली?
प्रजासत्ताक दिनानिमित्तच्या संचलनात महाराष्ट्र व पश्चिम बंगालच्या चित्ररथास केंद्र सरकारने परवानगी नाकारली.हा देशाचा उत्सव असून केंद्र सरकारने सर्व राज्यांना प्रतिनिधित्व देणे अपेक्षित आहे.परंतु सरकार आकसाने वागत असून विरोधकांची सत्ता असणाऱ्या राज्यांना सापत्नभावाची वागणूक देतेय.
— Supriya Sule (@supriya_sule) January 2, 2020
यावरून आता राजकारण सुरू झालं असून राष्ट्रवादीच्या नेत्या खा. सुप्रिया सुळे यांनी याबद्दल केंद्रातील भाजप सरकारवर निशाणा साधला आहे. केंद्र सरकार विरोधकांची सत्ता असलेल्या राज्यांशी आकसाने वागत असल्याचा आरोप सुळे यांनी केला आहे. केंद्र सरकारने सर्व राज्यांना प्रतिनिधीत्व देणं अपेक्षित असून केंद्र सरकार महाराष्ट्र आणि प. बंगाल या राज्यांना सापत्नभावाची वागणूक देत असल्याचं ट्विट सुळे यांनी केलं आहे.