Advertisement

महाराष्ट्रात सध्या ६० हजाराहून अधिक रुग्ण ऑक्सिजनवर!

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात आॅक्सिजन आणि रेमडेसिवीरचा पुरवठा वाढवण्यात यावा, अशी मागणी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली.

महाराष्ट्रात सध्या ६० हजाराहून अधिक रुग्ण ऑक्सिजनवर!
SHARES

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोविड संसर्ग रोखण्यावर लॉकडाऊन (lockdown) हा अखेरचा पर्याय सांगितला असला, तरी महाराष्ट्रावर दुर्दैवाने असे कडक निर्बंध लावण्याची वेळ आली आहे. महाराष्ट्रात सध्या ६० हजाराहून अधिक रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात आॅक्सिजन आणि रेमडेसिवीरचा पुरवठा वाढवण्यात यावा, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली.

पंतप्रधानांसोबत कोविडसंदर्भात आयोजित व्हिडिओ काॅन्फरन्सिंग बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत होते. या बैठकीत इतर राज्यांचेही मुख्यमंत्री सहभागी झाले होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी लक्षणे नसलेल्या किंवा सौम्य लक्षणांच्या रुग्णांना गृह विलगीकरणात ठेवून त्यांना डॉक्टरांच्या सल्ल्याने आवश्यक ती औषधे देऊन उपचार करण्यात येत आहेत तसंच निवृत्त डॉक्टर्सच्या जोडीने वैद्यकीय विद्यार्थ्यांची मदत घेण्यात येत आहे, अशी माहितीही दिली.

विमानांचा वापर

महाराष्ट्राला (maharashtra) अधिक ऑक्सिजनची गरज असून रेमडेसिवीरचा पुरेसा पुरवठाही आवश्यक आहे. ऑक्सिजन विमानाने आणणं शक्य नसल्यास वेळ वाचविण्यासाठी रिकामे टँकर्स विमानाने प्लॅंट्सच्या ठिकाणी पाठवून ऑक्सिजन भरून इतर मार्गाने महाराष्ट्रापर्यंत पोहोचवा, अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी केली. 

हेही वाचा- महाविकास आघाडी सरकारमुळे महाराष्ट्रात मरण स्वस्त झालंय!, प्रविण दरेकर संतापले

महाराष्ट्रात ६० हजाराहून अधिक रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. राज्यात ७६,३०० ऑक्सिजन बेड्स आहेत. २५,००० पेक्षा अधिक आयसीयू बेड्सची व्यवस्था करण्यात आली आहे. महाराष्ट्राला दररोज १५५० मे टन ऑक्सिजनची आवश्यकता आहे. ३०० ते ३५० मे टन ऑक्सिजन महाराष्ट्रबाहेरून आणला जात आहे. राज्याला दूरच्या अंतरावरील इतर राज्यातून ऑक्सिजन उपलब्ध करून देण्यात येत आहे. जवळपासच्या राज्यातून पुरवठा झाला तर तो लवकर उपलब्ध होईल. सातत्याने कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता २५० ते ३०० मे टन अतिरिक्त साठा उपलब्ध असणं गरजेचं आहे.

आपण रेल्वे मागाने ऑक्सिजन आणण्याचा प्रयत्न केला, पण प्रवासाचा वेळ व अंतर लक्षात घेता ‘वायुदलाची’ व ‘राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन’ विभागाची मदत घेण्याची आवश्यकता. केंद्र शासनाकडे १३,००० जम्बो सिलेंडर व सुमारे ११०० व्हेंटिलेटर्सची मागणी देखील करण्यात आली. 

रेमडेसिवीरने सुविधांवर कमी ताण

रेमडेसिवीर किती उपयुक्त आहे ते सांगता येत नाही, पण रुग्णांचा रुग्णालयांतील कालावधी निश्चितपणे कमी करत आहे. त्यादृष्टीने राज्याला रुग्ण संख्येनुसार पुरेसा पुरवठा व्हावा असेही मुख्यमंत्री म्हणाले. रेमडेसिवीर व्यतिरिक्त इतर आवश्यक औषधांचा देखील तुटवडा भासू शकतो, हे लक्षात घेऊन केंद्राने तो पुरवठाही नियमित होत राहील, अशी अपेक्षा उद्धव ठाकरे (uddhav thackeray) व्यक्त केली.

रुग्णालयात राहण्याचा रुग्णाचा कालावधी रेमडेसिवीरमुळे कमी होत असल्याने ऑक्सिजनचा वापर, बेड्स उपलब्धता आणि एकूणच आरोग्य सुविधांवर कमी ताण पडतो. महाराष्ट्राला दररोज ७० हजार व्हायल्सची गरज आहे. मात्र दररोज २७ हजार व्हायल्सचे वाटप होतं आहे. त्यामुळे रेमडेसिवीर अधिक प्रमाणात उपलब्ध होणं आवश्यक आहे. परदेशातून रेमडेसिवीर आयात करायला परवानगी देण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली.

(maharashtra cm uddhav thackeray once again demands of oxygen and remdesivir from pm narendra modi)

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा