Advertisement

कोरोनाची दुसरी लाट त्सुनामी ठरू शकते!- उद्धव ठाकरे

दिवाळी प्रकाशपर्वाचा सण असल्याने प्रदूषण आणि गर्दी टाळून तो साधेपणाने आणि आनंदाने साजरा करावा, असं आवाहन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं.

कोरोनाची दुसरी लाट त्सुनामी ठरू शकते!- उद्धव ठाकरे
SHARES

जगभरात येत असलेली कोरोनाची दुसरी लाट (coronaviru) ही त्सुनामी असू शकते, आपल्याकडे ती येऊ द्यायची नसेल तर गाफील न राहता शिस्तीचं पालन आवश्यक आहे. त्यामुळे दिवाळी प्रकाशपर्वाचा सण असल्याने प्रदूषण आणि गर्दी टाळून तो साधेपणाने आणि आनंदाने साजरा करावा, असं आवाहन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी केलं.

दिवाळीनंतरचे दिवस हे हिवाळ्याचे दिवस असल्याने आपल्याला अधिक काळजी घ्यावी लागेल. इटली, स्पेन, इंग्लंड, नेदरलँडसारख्या देशात कोरोनाची दुसरी जबरदस्त लाट आलेली दिसून येत आहे. दुसऱ्या टप्प्यात हा विषाणू दुप्पट वेगाने वाढत असल्याने काही ठिकाणी पुन्हा कडक लॉकडाऊन लावण्यात आलं आहे.

हेही वाचा- महाराष्ट्राच्या बदनामीचा कट उधळून लावला- उद्धव ठाकरे

त्यामुळे भारतात आणि महाराष्ट्रात ही दुसरी लाट येऊच द्यायची नसेल तर शिस्तीचं पालन आवश्यक आहे. मास्क लावणे, हात धुणे आणि शारीरिक अंतराचे पालन करणे या त्रिसूत्रीचा अवलंब प्रत्येकाला करावाच लागेल. मास्क न वापरणं ही गोष्ट अजिबात खपवून घेतली जाणार नाही. कारण एक कोरोना पॉझेटिव्ह रुग्ण ४०० जणांना बाधित करू शकतो. ते चारशे जण किती जणांना बाधित करतील याचा विचार प्रत्येकाने करण्याची गरज आहे. जे नागरिक मास्क वापरणार नाहीत त्यांच्या विरुद्ध कडक दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ या अभियानात ६० हजार टीम सहभागी झाल्या. या टीमने घरोघरी जाऊन राज्यातील लोकांची आरोग्य तपासणी केल्यामुळे राज्याचा आरोग्यविषयक नकाशा यातून स्पष्ट झाला. या तपासणीमध्ये साडेतीन लाख आयएलआय व सारीचे रुग्ण आढळले. १३ लाख लोकांना उच्च रक्तदाबाचा त्रास असल्याचं आढळलं, तर ८ लाख ६९ हजार ३७० लोकांना मधुमेह असल्याचे लक्षात आलं. ७३ हजार लोकांना हृदयरोग तर १८८४३ लोकांना कर्करोग असल्याची माहिती यातून मिळाली. १ लाख ६ हजाराहून अधिक लोकांना इतर आजार असल्याचं दिसून आलं. या अभियानात ५१ हजारापेक्षा अधिक लोकांना कोरोना झाल्याचं लक्षात आलं, अशी माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली.

(maharashtra cm uddhav thackeray talks about second wave of coronavirus)

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा