अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर केला. हा अर्थसंकल्प सादर करताना त्यांनी विठ्ठलाला प्रमाण केला. तसेच वारकऱ्यांच्या दिंडीसाठी आम्ही भरीव मदत दिली. दिंडीदरम्यान आम्ही वारकऱ्यांची तपासणी करू, असे अजित पवार म्हणाले.
यासोबतच त्यांनी अनेक योजना राबवत असल्याची माहिती दिली.
अजित पवार यांनी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा केली आहे. या योजनेनुसार महिलांना वर्षाला तीन गॅस सिलिंडर मोफत मिळणआर आहेत. या योजनेचा फायदा 52 लाख कुटुंबियांना होणार आहे.
तसेच लेक लाडकी योजनेची अजित पवार यांच्याकडून घोषणा करण्यात आली आहे. महिलांना प्रतिमहिना दीड हजार रुपये मिळणार असल्याचे ते म्हणाले.
स्त्री ही कुटुंबाचा आधार आहे. एकहाती कुटुंब सांभाळणाऱ्या महिलाही आपल्याला पाहायला मिळत आहेत. या महिलांना सधी उपलब्ध करून देणे ही सरकारची जबाबदारी आहे. म्हणूनच आमच्या लेकी-बहिणींसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची मी घोषणा करत आहे. ही एक व्यापक आणि महत्त्वाकांक्षी योजना आहे. महिलांचे स्वावलंबन, पोषण अशा सर्वांगीन विकासासाठी या योजेअंतर्गत 21 ते 60 वर्षे वयाच्या पात्र महिलांना दरमहा दीड हजार रुपये देण्यात येईल. यासाठी दरवर्षी 46 हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करण्यात येईल. या योजनेची अंमलबजावणी जुलै 2024 पासून करण्यात येईल.