दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाची दखल घेणारं ट्विट आंततराष्ट्रीय पाॅप गायिका रिहानाने केल्यावर देशभरात खळबळ माजली. आंदोलनाच्या विरोधात आणि बाजूने बोलणाऱ्या सेलिब्रिटींच्या प्रतिक्रियांवर प्रतिक्रिया येऊ लागल्या. त्यातच केंद्राने सरकारच्या बाजूने प्रतिक्रिया देण्यासाठी काही सेलिब्रिटींवर दबाव टाकल्याचं आता म्हटलं जाऊ लागलं आहे. या सगळ्या प्रकारावर देशात गदारोळ सुरू असताना राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (anil desmukh) यांनी सेलिब्रिटींच्या ट्विटची चौकशी करणार असल्याचं सांगितलं आहे.
केंद्रीय कृषी कायद्याला विरोध करणाऱ्या शेतकरी आंदोलनाचा प्रश्न दिवसेंदिवस चिघळतानाच दिसून येत आहे. २६ जानेवारी रोजी ट्रॅक्टर रॅली दरम्यान या आंदोलनाने हिंसक वळण घेतलं. आंदोलकांनी लाल किल्ल्यावर जाऊन निदर्शने केली. त्यांना सुरक्षा दल आणि आंदोलकांमध्ये जोरदार धुमश्चक्री झाली. कित्येक आंदोलक आणि जवान जखमी झाले. या सगळ्या प्रकारामुळे शेतकरी आंदोलनाकडे जगाचं लक्ष वेधलं गेलं. आंतरराष्ट्रीय पाॅप गायिका रिहाना हिने शेतकऱ्यांचं समर्थन करणारं ट्विट केल्यानंतर तर हा मुद्दा जागतिक बनला. आंतरराष्ट्रीय पातळीवरील सेलिब्रिटींकडून याबद्दल मतं व्यक्त होऊ लागली.
हेही वाचा- तर महाराष्ट्रात शिवसेना उरलीच नसती, अमित शहांची टीका
तर दुसऱ्या बाजूला भारतीय सेलिब्रिटी देखील यावर व्यक्त होऊ लागले. केंद्र सरकारने घेतलेल्या आडमुठ्या भूमिकेमुळे आंदोलन चिघळत जाऊन जागतिक स्तरावर भारताची प्रतिमा मलिन झाली, असं मत काहींनी व्यक्त केलं. तर बाहेरच्या व्यक्तींना भारताच्या अंतर्गत बाबींमध्ये नाक खुपसायची काहीच गरज नाही, असं म्हणत काही काहींनी टीका देखील केली.
कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी दिल्लीच्या सीमेवर गेल्या ७० दिवसांपासून आंदोलन करीत असलेल्या शेतकऱ्यांच्या मुद्यावर देशातील सेलिब्रेटीजचा केंद्रसरकारने गैरवापर केल्याप्रकरणी महाराष्ट्र काँग्रेसच्या शिष्टमंडळाने मला चौकशी करण्याचे व्हिडीओ https://t.co/xgA0jKbdu7
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) February 8, 2021
(१/२)
याचप्रकारे सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर यांसारख्या भारतरत्नांनी देखील भाजप (bjp) सरकारची बाजू घेतल्यानंतर त्यांना सोशल मीडियावरून ट्रोलर्सच्या टीकेचा सामना करावा लागला. त्यानंतर केंद्र सरकारने सेलिब्रिटींवर दबाव टाकून त्यांना सरकारच्या बाजूने ट्विट करायला लावलं, असा आरोप विरोधकांकडून होत आहे.
त्यावर प्रतिक्रिया विचारली असता राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी, भारतरत्नाने सन्मानित केलेल्या व्यक्ती आमच्या सगळ्यांसाठी सन्माननीय आहेत.पण त्यांच्यावर कोणत्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी दबाव टाकला का? त्या नेत्याची चौकशीची मागणी काँग्रेस पक्षाने केली आहे. त्यानुसार सेलिब्रिटींच्या ट्विटची चौकशी करणार असून या विषयावर नियमानुसार कारवाई करण्याचं आश्वासन त्यांना दिल्याचं सांगितलं.
दरम्यान, सरकारने भारतरत्नांना अशाप्रकारे ट्विट करायला सांगणं चुकीचं आहे. फक्त एखाद्या सरकारी धोरणासाठी भारत सरकारने भारतरत्नांची प्रतिष्ठा पणाला लावू नये. लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर ही साधी माणसं आहेत. आपल्या भारत सरकारने सांगितलं म्हणून त्यांनी ट्विट केलं पण आज सर्व रोषाला त्यांनाच सामोरं जावं लागतंय, असं मत मनसे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांनी व्यक्त केलं होतं.
(maharashtra government will start inquiry of celebrity tweets on farmers protest in delhi border)