Advertisement

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक मनसे एकट्याने लढणार

मनसे कोणाशीही युती न करता स्वबळावर विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची घोषणा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी गोरेगाव येथे केली.

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक मनसे एकट्याने लढणार
SHARES

मनसे कोणाशीही युती न करता स्वबळावर विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची घोषणा अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी गोरेगाव येथे केली. जानेवारी-फेब्रुवारीमध्ये कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यासाठी सरकारकडे पैसे नसताना मोफत पैसे वाटण्याची योजना राज्य सरकारने जाहीर केल्यावरून राज ठाकरेंनी टीका केली. 

पैसे देण्यापेक्षा महिला व इतर लोकांना रोजगार आणि काम द्या, असे ठाकरे यांनी स्पष्ट केले. 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना' आणि इतर योजनांवर ठाकरे यांनी टीका केली. विधानसभा निवडणुकीनंतर मनसेची सत्ता येणार हे लक्षात घ्यायला हवे, असेही ते म्हणाले. जनतेच्या अपेक्षांनुसार महाराष्ट्र सुधारण्याचा संकल्प ठाकरे यांनी व्यक्त केला.

बदलापुरातील एका शाळेतील अल्पवयीन मुलींच्या लैंगिक छळाचे प्रकरण मनसेच्या महिला कार्यकर्त्याने पुढे आणले नसते तर हे कधीच कळले नसते. मनसे कार्यकर्त्यांनी दक्ष राहून जनतेची फसवणूक होत आहे की नाही, याकडे लक्ष द्यावे, अशी अपेक्षा ठाकरे यांनी व्यक्त केली.



हेही वाचा

लॉरेन्स बिश्नोई गँगने घेतली बाबा सिद्दिकींच्या हत्येची जबाबदारी

मोठी अपडेट : बाबा सिद्दिकींवर गोळीबार करणारे आरोपी कोण?

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा