Advertisement

विधानभवनात राणे, मुख्यमंत्री भेट


विधानभवनात राणे, मुख्यमंत्री भेट
SHARES

काँग्रेसचे आमदार असताना नारायण राणे यांचा विधान भवन परिसरातील वावर हा सगळ्यांसाठी नेहमीचा होता. मात्र काँग्रेस सोडल्यानंतर नारायण राणे विधान भवनात आले म्हटल्यावर सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानभवनात मंगळवारी सायंकाळी भेट घेतली. या भेटीत दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली, हे मात्र गुलदस्त्यात आहे.


खासदारकीवर लवकरच निर्णय

भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी नारायण राणे यांना राज्यसभेच्या उमेदवारीची ऑफर दिली होती. याबाबतचा निर्णय नारायण राणेंनी मुख्यमंत्र्यांना कळवला आहे. मुख्यमंत्री याबाबत बुधवारी अमित शहांबरोबर चर्चा करणार आहेत. चर्चा झाल्यावर दोन दिवसांनी निर्णय जाहीर करण्यात येणार आहे. दरम्यान सगळं व्यवस्थित घडेल, वाट पाहावी, अशी सूचक प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी राणेंसोबतच्या बैठकीनंतर दिली.


राज्याच्या राजकारणातच रहावं

भाजपनं राणेंना ही ऑफर दिली असली तरी त्यांनी राज्याच्या राजकारणातच सक्रीय राहावं, अशी इच्छा नारायण राणे यांचे चिरंजीव नितेश राणे यांनी व्यक्त केली होती. त्यांनी आपली ही भावना ट्विटर आणि व्हॉटसअॅप डीपीच्या माध्यमातून व्यक्त केली होती.



हेही वाचा-

मंत्रीपद नव्हे, तर खासदारकीची आॅफर, दिल्लीवारीनंतर राणेंचा दावा

माझं भविष्य खरं ठरत नाही! राणेंची हतबलता



संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा