Advertisement

'जय भवानी, जय शिवाजी' रेकॉर्डवरून काढणं चुकीचं- नाना पटोले

सभागृहाचं कामकाज नियमानुसारच चाललं पाहिजे यात दुमत नाहीत. पण जनभावना आणि श्रद्धाही तितक्याच महत्वाच्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचंच नव्हे, तर देशाचं दैवत आहे, असं नाना पटोले म्हणाले.

'जय भवानी, जय शिवाजी' रेकॉर्डवरून काढणं चुकीचं- नाना पटोले
SHARES

'जय भवानी, जय शिवाजी' ही घोषणा रेकॉर्डवरून काढणं चुकीचं आहे. सभागृहाचं कामकाज नियमानुसारच चाललं पाहिजे, यात काही वाद नाही. पण जनभावना आणि श्रद्धाही तितक्याच महत्वाच्या आहेत. मी जर राज्यसभा अध्यक्षांच्या जागी असतो तर जनभावनेचा आदर करूनच निर्णय घेतला असता, असा दावा करत महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी या वादात उडी घेतली आहे. (maharashtra vidhan sabha president nana patole comment over bjp mp udayanraje bhosale slogan controversy)

राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी सभागृह सदस्यत्वाची शपथ घेतल्यानंतर शेवटी 'जय भवानी, जय शिवाजी' ही घोषणा दिली होती. या घोषणेनंतर राज्यसभेचे अध्यक्ष उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी उदयनराजेंना समज दिली होती. त्यावरून महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चांना उत आला होता. 

लोकभावनेचा आदर हवा

त्यावर भाष्य करताना विधानसभा अध्यक्ष नाना पटोले म्हणाले, सभागृहाचं कामकाज नियमानुसारच चाललं पाहिजे यात दुमत नाहीत. पण जनभावना आणि श्रद्धाही तितक्याच महत्वाच्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचंच नव्हे, तर देशाचं दैवत आहे. त्यामुळे त्यांचा उल्लेख रेकॉर्डवरून काढणं चुकीचं आहे. तालिकेवरील व्यक्तीला असे निर्देश देण्याचा काहीच अधिकार नसतात. त्यांनी जनतेच्या भावनेचा आदर केला पाहिजे. सभागृहात जनभावनेचा आदर व्हायलाच हवा. राज्यसभा अध्यक्षांच्या जागी मी असतो, तर जनभावनेचा निश्चितच आदर केला असता, असं नाना पटोले यांनी सांगितलं.

हेही वाचा - शिवरायांच्या वंशजांचा दिल्ली दरबारी अपमान?, संजय राऊतांचा भाजपला चिमटा

नेमकं काय झालं?

भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी बुधवारी राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. शपथ घेतल्यानंतर उदयनराजे यांनी शेवटी ‘जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भवानी, जय शिवाजी’ अशा घोषणा दिल्या. त्यावर, “हे राज्यसभेचं सभागृह नसून माझं दालन आहे. दालनात घोषणाबाजी करू नये. सभागृहातही घोषणा देण्याची मुभा नसते. शपथ घेताना घोषणा देऊ नका त्याची नोंद होणार नाही,” अशा शब्दांत उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी उदयनराजे यांना समज दिली.

घटनेला धरूनच

त्यावर खुलासा करताना उदयनराजे यांनी स्पष्ट केलं की, जे घडलंच नाही त्यावरुन सध्या राजकारण सुरु आहे. मी गप्प बसणाऱ्यांपैकी नाही हे सर्वांना ठाऊक आहे. मी शपथ घेतल्यानंतर ‘जय भवानी, जय शिवाजी’ अशी घोषणा दिली. त्यावर काँग्रेसच्या खासदाराने आक्षेप घेतला. त्यानंतर राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी फक्त समज दिली की असं वक्तव्य करणं राज्यघटनेला धरुन नाही. त्यामुळे घेतलेली शपथच राज्यसभेच्या रेकॉर्डवर जाईल. व्यंकय्या नायडू सभापती या नात्याने घटनेला धरुनच बोलले. ते चुकीचं बोलले असते तर तिथेच बोललो असतो. मीच त्यांना माफी मागायला लावली असती, असं उदयनराजे यांनी सांगितलं.

हेही वाचा - तर तिथेच राजीनामा दिला असता- उदयनराजे भोसले

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा