Advertisement

भाजपमधून मोठ्या प्रमाणात घरवापसी होणार- बाळासाहेब थोरात


भाजपमधून मोठ्या प्रमाणात घरवापसी होणार- बाळासाहेब थोरात
SHARES

भाजपमधील आणखी काही नेते काँग्रेसच्या वाटेवर असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली. अहमदनगर जिल्ह्यातील भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांनी मंगळवारी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं.

मुंबईत गांधी भवन इथं झालेल्या एका कार्यक्रमात अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील माजी जिल्हा परिषद सदस्य, अभिनव शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मधुकरराव नवले, माजी जिल्हा परिषद सदस्य व अगस्ती साखर कारखान्याचे संचालक मीनानाथ पांडे, बुवासाहेब नवले, रमेश जगताप, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सरचिटणीस मदन पथवे, सावरगावपाठचे सरपंच रमेश पवार, समशेरफट गावचे सरपंच भास्करराव दराडे, देवगण गावचे एकनाथ सहाणे यांनी बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

भाजपमधून मोठ्या प्रमाणात घरवापसी होणार असून, अनेक ज्येष्ठ नेते लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचंही त्यांनी म्हटलं. केंद्रातील सरकारनं गरीब माणसाला ताकद देणारे कामगार हिताचे कायदे बदलण्याचे काम केले आहे. काही मूठभर लोकांसाठी, साठेबाज लोकांसाठी कृषी कायदे केले आहेत.

कृषी कायद्याच्या विरोधात दिल्लीत एक महिन्यापासून आंदोलन सुरू आहे, हजारो शेतकऱ्यांनी दिल्लीला वेढा घातला आहे, पण केंद्र सरकारकडे सहानुभूती नाही. त्यांची ही भूमिका अडवणुकीची असल्याची टीका त्यांनी केली.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा