आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा समाज पुन्हा एकदा आक्रमक झाला असून सरकारपुढे सादर करण्यात येणाऱ्या मागण्या मान्य न झाल्यास येत्या १० आॅक्टोबर रोजी महाराष्ट्र बंद करण्याचा इशारा देण्यात आला आहे. कोल्हापूमध्ये झालेल्या मराठा समाज गोलमेज परिषदेत हा निर्णय घेण्यात आला. या गोलमेज परिषदेत १५ ठराव देखील करण्यात आले आहेत. (maratha community announced maharashtra maharashtra bandh for reservation and other demands)
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला अंतरिम स्थगिती दिल्यामुळे मराठा समाज अस्वस्थ झाला आहे. मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी समाजातील प्रतिनिधी पुन्हा एकदा एकवटले आहेत. त्यानुसार मराठा आरक्षणासंदर्भात विचारविनिमय करण्यासाठी कोल्हापूरमध्ये मराठा संघटनांच्या प्रतिनिधींची गोलमेज परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेत मराठा समाजाच्या हिताचे १५ ठराव करण्यात आले. हे ठरावाद्वारे करण्यात आलेल्या मागण्या मान्य करण्यासाठी राज्य सरकारला ९ आॅक्टोबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. या मुदतीपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास १० आॅक्टोबरला महाराष्ट्र बंद ठेवण्यात येईल. मागण्या मान्य होईपर्यंत पुढील काळात राज्यभर आंदोलन सुरु राहील असा इशारा सरकारला देण्यात आला आहे.
हेही वाचा - मराठा समाजाला दिलासा देण्यासाठी ठाकरे सरकारचे ८ मोठे निर्णय
मंत्रिमंडळ बैठकीत मराठा समाजासाठी मदत जाहीर करण्यात आली आहे. परंतु ही मदत कधी आणि कशी दिली जाईल, याचा खुलासा राज्य सरकारने केलेला नाही. मुळात राज्य सरकारकडे सध्यस्थितीत निधीची कमतरता आहे. अधिवेशनात अशा कुठल्याही निधीची तरतूद करण्यात आलेली नाही. त्यामुळे जाहीर करण्यात आलेली मदत केवळ घोषणाच ठरू शकते. सरकारने ठरावांची अमलबजावणी न केल्यास १० तारखेनंतर थोबाड फोडो आंदोलन करू, असा इशारा यावेळी अध्यक्ष सुरेश पाटील यांनी दिला.
गोलमेज परिषदेतील १५ ठराव पुढीलप्रमाणे:
हेही वाचा - मराठा आरक्षणावरची अंतरिम स्थगिती हटवण्यासाठी न्यायालयात अर्ज