Advertisement

तूर्तास... पराभवानंतर राज ठाकरे म्हणाले

निकालानंतर मनसेच्या पदरी पुन्हा एकदा निराशा आली. विशेष म्हणजे या निवडणुकीत मनसेला एकही जागा जिंकता आलेली नाही.

तूर्तास... पराभवानंतर राज ठाकरे म्हणाले
SHARES

बहुप्रतिक्षित महाराष्ट्र विधानसभा 2024 चा (vidhan sabha elections) निकाल लागला आहे. या निवडणुकीसाठी अनेक पक्षांनी कंबर कसून प्रचार केला होता. प्रचारामध्ये राज ठाकरेंचा मनसे पक्षही आघाडीवर होता. मनसे अध्यक्ष राज ठाकरे तसेच मनसे पक्षाचे कार्यकर्त्यांना या निवडणुकीतून मोठी अपेक्षा होती.

तसेच या निवडणुकीत राज ठाकरेंनी माहिम मतदारसंघातून आपले पुत्र अमित ठाकरे (amit thackarey) यांना उभे केले होते. मात्र निकालानंतर मनसेच्या (mns) पदरी पुन्हा एकदा निराशा आली. विशेष म्हणजे या निवडणुकीत मनसेला एकही जागा जिंकता आलेली नाही.

तसेच राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरेही माहिम मतदारसंघात पराभूत झाले. ठाकरे गटाच्या महेश सावंत यांनी त्यांचा बहुमताने पराभव केला. या मोठ्या पराभवानंतर राज ठाकरे यांच्या प्रतिक्रियेवर साऱ्यांचे लक्ष लागून होते.

या पराभवानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackarey) यांनी ट्विटरद्वारे आपले मत व्यक्त केले आहे. त्यांनी ट्विटर पोस्टमध्ये (post) "अविश्वसनीय! तूर्तास एवढेच" असे म्हटले आहे. यावर अनेकांनी कमेट केली आहे. अनेकांनी पोस्टवर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याची मागणी केली आहे.  



हेही वाचा

वसई-नालासोपारा : हितेंद्र ठाकूर आणि क्षितीज ठाकूर यांचा पराभव

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 : दिंडोशी मतदारसंघ सुनील प्रभूंनी राखला

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा