महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (governor bhagat singh koshiyari) यांची भेट घेत वाढीव वीजबिलासंदर्भात चर्चा केली. 'मी वीज बिलाबाबत राज्यपालांशी भेटलो. याबाबत लवकरात लवकर निर्णय व्हावा. जर वेळ पडली तर मी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनाही भेटीन', असं राज ठाकरे यांनी या भेटीनंतर सांगितलं.
वीजबिलाबाबत मनसेनं प्रत्येक ठिकाणी आंदोलनं केली, अदानीसह अनेकजण भेटून गेले, ते म्हणाले एमईआरसीनं आम्हाला मान्यता द्यावी. आमचं शिष्टमंडळ एमईआरसीला भेटलं. त्यांचं लेखी पत्र आमच्याकडं आहे. एमईआरसीचं म्हणणं आहे कंपन्या आहेत त्या वीजबिलासंदर्भात निर्णय घेऊ शकतात. म्हणजे एका बाजूला एमईआरसीकडं बोट दाखवते, कंपन्या एमईआरसीकडं दाखवतात.
वीज ग्राहकांना दिलेला वाढीव वीज बिलांचा शॉक आणि दुधाला न्याय्य भाव मिळावा ह्या शेतकऱ्यांच्या वाजवी मागणीकडे केलेलं दुर्लक्ष ह्यामुळे जनक्षोभ उसळला आहे तरीही सरकार शांत आहे तेंव्हा आता राज्यपाल महोदयांनीच ह्या विषयात सरकारला निर्देश द्यावेत अशी विनंती पक्षातर्फे करण्यात आली.
वीज ग्राहकांना दिलेला वाढीव वीज बिलांचा शॉक आणि दुधाला न्याय्य भाव मिळावा ह्या शेतकऱ्यांच्या वाजवी मागणीकडे केलेलं दुर्लक्ष ह्यामुळे जनक्षोभ उसळला आहे तरीही सरकार शांत आहे तेंव्हा आता राज्यपाल महोदयांनीच ह्या विषयात सरकारला निर्देश द्यावेत अशी विनंती पक्षातर्फे करण्यात आली. pic.twitter.com/N6zSuYX9ed
— MNS Adhikrut - मनसे अधिकृत (@mnsadhikrut) October 29, 2020
ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याशी बोलणं झालं, हा विषय आम्ही लवकरात लवकर निर्णय करु राज्यपालांशी बोलल्यावर ते म्हणाले पवारसाहेबांशी बोलून घ्या.. आम्ही बोलू त्यांच्याशी, असे राज ठाकरे म्हणाले. मात्र हा प्रश्न राज्य सरकारलाही माहिती आहे.. जिथे दोन हजार बिल येत होतं, तिथे दहा दहा हजार बिल येत आहे. जिथे ५ हजार येत होतं, तिथे २५ हजार येत आहे. मग हे राज्य सरकारला जर हे माहिती आहे, तर कशामध्ये हे प्रकरण अडकलंय ते माहिती नाही, असेही राज ठाकरेंनी यावेळी म्हटलं.
मनसे अध्यक्ष राज ठाकरेसुद्धा राज्यपालांच्या भेटीला
कमतरता प्रश्नांची नसून निर्णय घेण्याची आहे - राज ठाकरे