Advertisement

भाजपाविरोधात राज ठाकरे घेणार ८ ते ९ सभा

सोलापूर, सातारा, मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे, पिंपरी-चिंचवड, बारामती या ठिकाणी मनसेकडून स्वतंत्र सभा घेण्यात येणार आहेत. दरवर्षीप्रमाणं यंदाही गुढी पाडव्याला सभा होणार असून या सभेमध्ये राज अधिकृतरित्या घोषणा करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

भाजपाविरोधात राज ठाकरे घेणार ८ ते ९ सभा
SHARES

महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी यंदाची लोकसभा निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला होता. मात्र वर्धापनदिनी झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात राज यांनी निवडणूक लढवणार नसलो तरी सभा होणार असून या सर्व सभा नरेंद्र मोदी-अमित शहा यांच्या विरोधात असणार असल्याचं म्हटलं होतं. त्यानुसार, राज ठाकरे राज्यभरात ८ ते ९ ठिकाणी सभा घेणार असल्याचं समजतं. 


गुढी पाडव्याला सभा

सोलापूर, सातारा, मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे, पिंपरी-चिंचवड, बारामती या ठिकाणी मनसेकडून स्वतंत्र सभा घेण्यात येणार आहेत. राज यांच्या सभांचं नियोजन पक्षाकडून करण्यात येत आहे. दरवर्षीप्रमाणं यंदाही गुढी पाडव्याला सभा होणार असून या सभेमध्ये राज अधिकृतरित्या घोषणा करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.


सभेत काय बोलणार ?

शिवाजी पार्क येथे होणाऱ्या  सभेसाठी मनसे कार्यकर्त्यांकडून जास्तीत जास्त गर्दी जमविण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. पदाधिकाऱ्यांच्या बैठका, मेळावे घेऊन भाजपाविरोधातील मोहीम मनसे नेत्यांनी सुरु केली आहे. याशिवाय मनसे नेत्या शालिनी ठाकरे यांनी गुढी पाडव्यापासून नवे राज पर्व सुरू होणार असं म्हटलं आहे. त्यामुळे गुढी पाडव्याला होणाऱ्या सभेमध्ये राज ठाकरे काय बोलणार याची उत्सुकता राजकीय वर्तुळात आहे.



हेही वाचा -

कर्जाचे हप्ते घटणार, RBI ने केली व्याजदर कपात

मुंबई सत्र न्यायालयाशेजारील धोकादायक इमारत १५ मेपर्यंत खाली करा - हायकोर्ट



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा