दरवर्षीप्रमाणं यंदाही गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर राज ठाकरे यांची तोफ शिवतीर्थावर धडाडणार आहे. बुधवारी शिवाजी पार्कवर (Shivaji Park) होणाऱ्या मनसेच्या (MNS) गुढीपाडवा मेळाव्यात (Gudhi Padva Rally) राज ठाकरे (Raj Thackeray) कुणाचा समाचार घेणार, हे दाखवणारा हा टिझर प्रदर्शित करण्यात आला आहे.
मनसेचा टीझर
17 मार्चला मनसेने गुढीपाडव्या रॅलीचा टीझर प्रदर्शित केला होता. यात ॥ ठाकरी तत्त्व, मराठी सत्त्व आणि धर्माभिमानी हिंदुत्व ॥, असं कॅप्शन देण्यात आला होता. हा टेलर असून पूर्ण पिक्चर गुढी पाडव्याला शिवतिर्थावर दिसणार असल्याचे मनसेतर्फे सांगितलं जात आहे.
मनसेच्या नव्या टिझरमध्ये मराठी, हिंदू आणि महाराष्ट्राच्या मुद्द्यावर भर देण्यात आला आहे. हिंदू या 2 अक्षरांसाठी जगा, मराठी या 3 अक्षरांवर प्रेम करा, महाराष्ट्र या 4 अक्षरांसाठी काम करा, राज ठाकरे या 5 अक्षरे नेहमीच पाठीशी असतील, असं या टीझरमध्ये सांगण्यात आलं आहे. 22 मार्च रोजी संध्याकाळी 6 वाजता राज ठाकरे यांची मुंबईतील शिवतीर्थावर सभा होणार आहे.
राज ठाकरेंच्या निशाण्यावर कोण?
ठाकरे विचार जपण्यासाठी शिवतीर्थावर या, असं आवाहन राज ठाकरे यांनी केलं आहे. महाराष्ट्रातल्या शिंदे विरुद्ध ठाकरे (Shinde vs Thackeray) सत्तासंघर्षाचा ते समाचार घेतील. मशिदीवरच्या भोंग्याचा मुद्दा काढून ते पुन्हा एकदा कट्टर हिंदुत्ववादी भूमिका मांडतील, अशी चर्चा रंगली आहे. संभाजीनगर नामांतरला एमआयएमचा विरोध, लव्ह जिहादसारख्या मुद्यांवरही ते परखड भाष्य करण्याची देखील शक्यता आहे.
हेही वाचा