Advertisement

मनसेची मैदान बचाव जनमत चाचणी


मनसेची मैदान बचाव जनमत चाचणी
SHARES

भायखळा - म्हाडा संकुल मैदानाला वाचवण्यासाठी फेरबंदर न्यू हिंद म्हाडा वसाहत परिसरात मनसेच्या वतीनं रविवारी जनमत चाचणी घेण्यात आली. महापालिकेच्या वतीनं स्थानिक वाहतूक समस्या सोडवण्यासाठी मैदानाच्या जागेवर 2 मजली पार्किंग, कम्युनिटी हॉल, वेलफेअर सेंटर, कार्यक्रम हॉल आणि शोरूम बनवण्यासाठीचे विविध प्रस्ताव आहेत. मात्र पालिकेच्या या प्रस्तावावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं विरोध दर्शवलाय. संपूर्ण विभागात मुलांना खेळण्यासाठी एकच मैदान असल्यानं या प्रस्तावाला मनसेनं विरोध दर्शवला. प्रभाग क्रमांक 208 ( जुना वॉर्ड 202 ) स्थानिक नगसेविका समिता नाईक यांच्या नेतृत्वाखाली मैदान वाचवण्यासाठी जनमत चाचणी घेण्यात आली. या वेळी मनसेचे नेते संजय नाईक, भायखळा विभाग प्रमुख विजय लिपारे आणि कार्यकर्ते उपस्थित होते. मैदान वाचवण्यासाठी स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने आपलं मत मतपेटीत टाकून पालिकेच्या प्रस्तावाला विरोध केला.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा