“लाऊडस्पीकरसंदर्भात २००५ मध्ये सुप्रीम कोर्टानं निर्णय दिला असल्यानं तो संपूर्ण देशाला लागू आहे. त्यामुळे केंद्र सरकारनंच राष्ट्रीय पातळीवर काही निर्णय घेतला आणि संपूर्ण देशासाठी लागू केला तर राज्यांमध्ये वेगळी परिस्थिती होणार नाही. गरज लागल्यास सर्वपक्षांनी एक शिष्टमंडळ घेऊन केंद्रीय नेत्यांना भेटावं आणि त्यातून भूमिका स्पष्ट करावी अशी भूमिका आहे,” अशी भूमिका आज बैठकित घेण्यात आली.
दिलीप वळसे पाटील यांनी राज्य सरकारची भूमिका मांडल्यानंतरही मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलेला ३ मे चा अल्टिमेटम कायम असल्याचं मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी जाहीर केलंय.
गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी भोंग्याच्या मुद्द्यावरुन सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीला मनसे नेते बाळा नांदगावकरही सहभागी झाले होते. या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना बाळा नांदगावकर यांनी राज ठाकरे यांनी ३ मे पर्यंतचा अल्टिमेटम दिलाय तो कायम असल्याचं म्हटलंय.
सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत सहभागी झालो. आम्ही आमच्या मतावर ठाम आहोत. सरकारनं ठरवलं पाहिजे कशाप्रकारे मार्गदर्शक सूचना असाव्यात. आमच्या ३ मे चा अल्टिमेटम कायम आहे, असं नांदगावकर म्हणाले.
राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे हटवण्यासाठी महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारला ३ मे पर्यंतचा अल्टिमेटमही दिलाय. राज्य सरकारनं मशिदींवरील भोंगे हटवले नाही तर त्यासमोर लाऊडस्पीकरवर हनुमान चालिसा लावण्याचे आदेशच राज यांनी मनसैनिकांना दिलेत.
हेही वाचा