Advertisement

‘त्या’ २७ गावांची वेगळी नगरपालिका करा, मनसे आमदाराने घेतली उपमुख्यमंत्र्यांची भेट

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (mns) आमदार राजू पाटील (raju patil) यांनी नुकतीच उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांची भेट घेतली. या भेटीत डोंबिवलीतील २७ गावांची वेगळी नगरपालिका (municipal council) करण्याची मागणी त्यांनी उपमुख्यमंत्र्यांकडे केली.

‘त्या’ २७ गावांची वेगळी नगरपालिका करा, मनसे आमदाराने घेतली उपमुख्यमंत्र्यांची भेट
SHARES

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (mns) आमदार राजू पाटील (raju patil) यांनी नुकतीच उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांची भेट घेतली. या भेटीत डोंबिवलीतील २७ गावांची वेगळी नगरपालिका (municipal council) करण्याची मागणी त्यांनी उपमुख्यमंत्र्यांकडे केली.

राज्य शासनाने कल्याण-डोंबिवली महापालिका (KDMC) निवडणुकीआधी २७ गावांचा महापालिकेत समावेश केला. परंतु आधीच आर्थिक डबघाईत असलेल्या ‘केडीएमसी’ला या अतिरिक्त गावांचा भार पेलवेनासा झाला आहे. परिणामी या गावातील विकास खुंटल्याचं या गावातील ग्रामस्थांचं म्हणणं आहे. या गावांची पुन्हा स्वतंत्र नगरपालिका करावी, यासाठी ग्रामस्थांकडून मागील वर्षभरात अनेकदा आंदोलने करण्यात आली आहेत. 

हेही वाचा- मुंबईकरांवर आणखी वीजदरवाढ नको, राज ठाकरेंचं विद्युत नियामक आयोगाला पत्र

ही २७ गावे ‘केडीएमसी’त (kdmc) जाण्याआधी स्थानिक गावकऱ्यांनी ग्रामपंचायतीकडून (gram panchayat) परवानगी घेऊन परिसरात अनेक बांधकामे केली. परंतु गेल्या ३ वर्षांहून अधिक काळापासून या गावातील दस्त नोंदणी बंद असल्याने त्याचा व्यवसायावर परिणाम झाल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. 

या २७ गावांची वेगळी नगरपालिका (municipal council) करण्याबाबत २०१६ मध्ये विधानपरिषदेत लक्षवेधी मांडण्यात आली होती. त्यावर हरकती आणि सूचना मागवून अहवाल तयार करण्याचे आदेश तत्कालीन राज्य सरकारने कोकण विभागीय आयुक्तांना दिले होते. मात्र या आदेशाला चार वर्षे उलटूनही अद्याप काहीही कार्यवाही झालेली नाही.  

या पार्श्वभूमीवर मनसेचे कल्याण ग्रामीणमधील आमदार राजू पाटील (mns mla raju patil) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी २७ गावांची स्वतंत्र नगरपालिका (municipal council) करावी, कल्याण ग्रामीण मतदारसंघात येणाऱ्या दिवा शीळ डायघर विभागात टोरंट कंपनीला स्थगिती देण्यात यावी आणि २७ गावांकरीता येत्या अर्थसंकल्पात विशेष निधीची तरतूद करण्यात यावी, अशा विविध मागण्या केल्या. 

हेही वाचा- मनसेच्या मोर्चाला भाजपचा पाठिंबा? राज ठाकरे-शेलार यांच्यात खलबतं

विधानसभेत मनसेचं प्रतिनिधीत्व करणारे राजू पाटील (mns mla raju patil) हे एकमेव आमदार आहेत. प्रमोद उर्फ राजू रतन पाटील यांनी यंदाच्या विधानसभा निवडणुकीत कल्याण ग्रामीण मतदारसंघातून ८६,२३३ मतं मिळवत शिवसेनेचे रमेश म्हात्रे (८०,६६५) यांना पराभूत केलं हाेतं. मनसेने २०१९ मधील विधानसभा निवडणुकीत एकूण ११० उमेदवार उतरवले होते. परंतु यापैकी केवळ एकाच जागेवर मनसेला विजय मिळवता आला. त्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांनी राजू पाटील यांना कृष्णकुंजवर बोलवून त्यांचा सत्कार केला. यावेळी राज ठाकरे यांनी राजू पाटील यांनी बसण्यासाठी स्वत:ची खुर्ची देऊ केली होती. परंतु राजू पाटील यांनी नम्रपणे या खुर्चीवर बसण्यास नकार दिला होता.  

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा