मुंबई सेंट्रल (mumbai central) येथील बीआयटी (BIT) चाळींचा बीडीडी चाळींप्रमाणे पुनर्विकास करण्यात यावा आणि त्यासाठी महानगरपालिकेने (bmc) धोरण ठरवून निविदा काढाव्यात, अशी मागणी बीआयटी चाळीतील (chawl) रहिवासी करत आहेत. दरम्यान, त्यांनी विधानसभा (maharashtra politics) निवडणुकीवर (elections) बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबई सेंट्रल येथील बीआयटीच्या 19 इमारतींच्या पुनर्विकासाचे प्रयत्न 2006 पासून सुरू आहेत. मात्र आतापर्यंत त्यात अनेक वाद निर्माण झाले आहेत. त्यामुळे या चाळींचा पुनर्विकास अनेक वर्षांपासून रखडला आहे. या चाळीत रहिवाशांच्या दोन संघटना असून, त्यापैकी बीआयटी चाळ सेवा संघ या रहिवाशांच्या संघटनेने नुकताच निषेध व्यक्त करून निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे.
मुंबईतील सर्व बीआयटी चाळींना 100 वर्षे पूर्ण झाली आहेत. बीडीडी चाळींच्या पुनर्विकास धोरणानुसार बीआयटी चाळींचा पुनर्विकास करण्यात यावा, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे. जुने संमतीपत्र दाखवण्याच्या प्रस्तावाला या संघटनेने विरोध केला आहे.
महापालिका प्रशासनानेच निविदा मागवून विकासकाची निवड करावी, अशी मागणी चाळीतील रहिवाशांकडून गेल्या अनेक महिन्यांपासून केली जात आहे. मात्र महापालिका (BMC) प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याने चाळीतील रहिवाशांनी असा पवित्रा घेतला आहे.
हेही वाचा