विधानसभा निवडणुकीत बंडखोरी केलेल्या१५ पदाधिकाऱ्यांची मुंबई काँग्रेसने हकालपट्टी केली आहे. यामध्ये अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष इब्राहिम शेख, मुंबई महिला काँग्रेसच्या उपाध्यक्ष पुष्पा अहीर, अर्जुन सिंह, अमित भिलवारा यांचा समावेश आहे.
मुंबई काँग्रेसने पत्रक काढून या पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी केल्याची माहिती दिली. विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या अधिकृत उमेदवाराविरोधात बंडखोरी करणाऱ्या आणि उमेदवाराच्या विरोधात प्रचार करणाऱ्या या पदाधिकाऱ्यांना मुंबई काँग्रेस अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांनी निलंबीत केले आहे.
मुंबई काँग्रेसचे महासचीव संजीव बागडी, माजी युवक काँग्रेसचे पदाधिकारी महमूद देशमुख, माजी ब्लाॅक अध्यक्ष गणपत गावकर, मुंबई महिला काँग्रेस सचीव वैशाली गाला, मुंबई काँग्रेस महासचीव विष्णू ओहाळ, पप्पू ठाकूर, राजेश रिदलान, किरण आचरेकर, धीरज सिंह, आजाद खान, फहीम शेख आदी पदाधिकाऱ्यांची काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आली आहे. यामधील बहुतांश पदाधिकारी वांद्रा पूर्व विधानसभा मतदारसंघातील आहेत.
हेही वाचा -
आरेच्या मुद्द्यावर आमच्या आमदारबाई मूग गिळून बसल्या, पण मी शेवटपर्यंत लढणार- युवराज मोहिते
अखेर तृप्ती सावंत यांची शिवसेनेतून हकालपट्टी