Advertisement

मनसेचे संदीप देशपांडे यांच्यावर मॉर्निंग वॉकवेळी हल्ला


मनसेचे संदीप देशपांडे यांच्यावर मॉर्निंग वॉकवेळी हल्ला
SHARES

मनसेचे नेते, माजी नगरसेवक संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला झाला आहे. सकाळी मॉर्निंग वॉकला गेल्यावर त्यांच्या शिवाजी पार्क येथे हल्ला झाला. हल्लेखोर चेहऱ्यावर मास्क लावू आले होते. हल्ला करून हल्लेखोर पसार झाले. या हल्ल्यात देशपांडे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

मॉर्निंग वॉक करत असतानाच अचानक काही लोकांनी त्यांच्यावर हल्ला केला. त्यांना रॉड आणि स्टम्पने बेदम मारहाण करण्यात आली. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे संदीप देशपांडे प्रतिकार करू शकले नाही.

शिवाजी पार्कात मॉर्निंग वॉकला आलेल्या लोकांनी देशपांडे यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे हल्लेखोर पसार झाले. त्यानंतर स्थानिकांनी तात्काळ देशपांडे यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  

देशपांडे यांच्यावर हल्ला झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरल्यानंतर मनसेचे नेते, पदाधिकारी आणी कार्यकर्ते तात्काळ हिंदुजा रुग्णालयात पोहोचले आहेत.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा