Advertisement

गुड न्यूज! महापालिका कर्मचाऱ्यांना ७ वा वेतन आयोग लागू

महापालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा महत्वपूर्ण निर्णय मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

गुड न्यूज! महापालिका कर्मचाऱ्यांना ७ वा वेतन आयोग लागू
SHARES

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाने स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना खूश खबर दिली आहे. महापालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा महत्वपूर्ण निर्णय मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. 

येत्या १ सप्टेंबरपासून नगरपरिषद, नगरपंचायत आणि महानगरपालिकेतील अधिकारी तसंच कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात येईल. त्यामुळे या कर्मचाऱ्यांच्या वेतनात घसघशीत वाढ होईल. मागील अनेक दिवसांपासून सातवा वेतन आयोग लागू करण्याची या कर्मचाऱ्यांची मागणी होती. 

मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार राज्याच्या ३६२ नगरपरिषदा आणि नगरपंचायत तसंच २६ महापालिकेतील कर्मचारी, अधिकारी त्याचसोबत निवृत्ती वेतनधारकांनाही या निर्णयाचा लाभ मिळणार आहे. १ जानेवारी २०१६ ते ३१ आॅगस्ट २०१९ पर्यंतची थकबाकी पुढील ५ वार्षिक हप्त्यांत सरकारकडून मिळणार आहे. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण पसरलं आहे. 



हेही वाचा-

राज्य कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! महागाई भत्त्यात ३ टक्के वाढ

कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगाची सुधारित श्रेणी लागू होणार, मंत्रीमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा