Advertisement

मुंबई पोलिसांवर खोटे आरोप करणं नवनीत राणांना भोवणार?

मुंबई पोलिसांवर खोटे आरोप केल्याप्रकरणी नवनीत राणांवर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.

मुंबई पोलिसांवर खोटे आरोप करणं नवनीत राणांना भोवणार?
SHARES

मुंबई पोलिसांवर खोटे आरोप केल्याप्रकरणी नवनीत राणांवर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. राणा यांनी केलेल्या तक्रारीत खार पोलीस ठाण्यात चुकीच्या वागणुकीचा उल्लेख करण्यात आला होता. पण मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी राणा दाम्पत्य पोलीस ठाण्यात चहा घेत असल्याचा व्हिडीओ ट्वीट केला.

नवनीत राणा यांच्यावर मुंबई पोलिसांची प्रतिमा मलिन करणे, पोलिसांवर खोटे आरोप करणे याप्रकरणी गुन्हा दाखल होण्याची शक्यता असल्याची माहिती मिळतेय. गृह खात्याचा याबाबतचा अहवाल लवकरच लोकसभा सचिवांना पाठवण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. गृह खात्याच्या अहवालानंतर नवनीत राणा यांच्यावर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, संजय पांडे यांनी केलेल्या ट्वीटनंतर शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

मागील काही दिवसांपासून मुंबई पोलिसांना बदनाम करण्याचे कारस्थान सुरू आहे. राणा दाम्पत्याने मुंबई पोलिसांवर खोटे आरोप लावलेत. त्याशिवाय, राज्याचे मुख्यमंत्रीपद भुषवलेले आणि विद्यमान विरोधी पक्षनेत्यांनी मुंबई पोलीस दलावर खोटे आरोप लावणे चुकीचे असल्याचे राऊत यांनी म्हटले. पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी बिनबुड्याच्या आरोपांना पुराव्यासकट उत्तर दिले असून देशाने संजय पांडेंचे आभार मानले पाहिजे असे संजय राऊत यांनी म्हटले. राणा यांच्याशी मुंबई पोलीस सौजन्याने वागले असल्याचे दिसून आल्याचे त्यांनी म्हटले.



हेही वाचा

पोलिस स्टेशनमध्ये चहा पितानाचा राणा दाम्पत्यांचा व्हिडिओ पोलिसांकडून जाहीर

बिनकामाचे भोंगे... मी काडीची किंमत देत नाही, उद्धव ठाकरेंचा राज यांना टोला

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा