राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांनी दिल्लीत केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी पुरंदर विमानतळासाठी आवश्यक जमीन अधीग्रहणासंदर्भात चर्चा केली. या भेटीत त्यांनी शेतकरी आंदोलनावरून भाजप (bjp) नेत्यांना पुन्हा एकदा टोला लगावला.
पुरंदर विमानतळाच्या जमीन अधिग्रहणासंदर्भात शरद पवार आणि संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांच्यात अर्धा तास बैठक झाली. या बैठकीनंतर ''पुणे शहराच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर हवाई वाहतुकीचा वाढता भार असल्याने पुरंदर इथे नवा विमानतळ स्थापन करण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र सरकारने दिलाय. प्रस्तावित विमानतळाचे काम जलदगती व प्राधान्यक्रमाने सुरू व्हावे यासाठी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांची भेट घेतल्याचं शरद पवार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन सांगितलं.
या भेटीनंतर शरद पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी ज्या पत्रावरून शरद पवार यांच्यावर टीका करण्यात येत आहे, त्या पत्राचा संदर्भ देताना ते म्हणाले की, कृषीमंत्री असताना लिहिलेल्या पत्रात एपीएमसी मार्केटमध्ये सुधारणा केली पाहिजे, असा उल्लेख आहे. केंद्राचे जे कृषी कायदे आहेत, त्यात एपीएमसी मार्केटचा उल्लेखच नाही. त्यामुळे या प्रकरणावरून आम्हाला उगाच बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. किमान एमपीएमसीचा उल्लेख आहे. ते पत्र विरोधकांनी नीट वाचावं, अशा शब्दांत सुनावलं.
हेही वाचा- “माझी चूक झाली”, शरद पवार पत्रकार परिषद साेडून निघून गेले
पुणे शहराच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर हवाई वाहतुकीचा वाढता भार असल्याने पुरंदर इथे नवा विमानतळ स्थापन करण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र सरकारने दिलाय. प्रस्तावित विमानतळाचे काम जलदगती व प्राधान्यक्रमाने सुरू व्हावे यासाठी केंद्रीय संरक्षण मंत्री श्री. @rajnathsingh यांची भेट घेतली. pic.twitter.com/I4DoxjP27t
— Sharad Pawar (@PawarSpeaks) December 9, 2020
तसंच कृषी कायद्यावर चर्चा झाल्याशिवाय त्यावर भाष्य करणार नाही, असं मी म्हटलं होतं. तरीही तुम्ही सगळे बाहेर उभे असल्याने मला बरं वाटलं नाही, म्हणून मी तुम्हाला बोलावलं. तरीही प्रश्नाचे एकदा उत्तर देऊनही तुम्ही मला तोच प्रश्न वारंवार विचारून माझा वेळ वाया घालवत आहात. तुम्हाला बोलावूनच चूक केली. यापुढे तुम्हाला बोलावणार नाही, अशा शब्दांत शरद पवार यांनी पत्रकारांनाही धारेवर धरलं.
याआधी शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषद घेताना विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी शरद पवार यांच्या जुन्या पत्राचा उल्लेख केला होता. ऑगस्ट २०१० मध्ये शरद पवार यांनी लिहिलेल्या पत्रात शेती क्षेत्राचा संपूर्ण विकास, रोजगार आणि आर्थिक प्रगतीसाठी चांगल्या बाजाराची आवश्यकता असल्याचं त्यांनीच सांगितलं होतं. शरद पवार यांनी ऑगस्ट २०१० आणि नोव्हेंबर २०११ या काळात सर्वच राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना पत्र पाठविलं आणि त्यात एपीएमसी कायद्यात सुधारणांवर भर दिला होता. बाजारपेठ सुविधा क्षेत्रात खाजगी सहभागाला प्रोत्साहन देण्यावर त्यांचा भर होता.
काँग्रेस पक्षाच्या २०१९ च्या घोषणापत्रात उल्लेख. त्यात काँग्रेसने (congress) स्पष्टपणे म्हटलं होतं की, काँग्रेस सत्तेत आल्यास बाजार समित्यांचा कायदा निरस्त करण्यात येईल आणि शेतमालाच्या खुल्या व्यापारासाठी व्यवस्था उभी करण्यात येईल. ज्या सुधारणा काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काळात झाल्या, त्या आता देशपातळीवर झाल्या तर विरोध का? असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला होता.
(ncp chief sharad pawar meet defence minister rajnath singh on purandar airport pune)
हेही वाचा- सुप्रिया सुळे महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री? शरद पवार म्हणाले...