Advertisement

अनिल देशमुखांवर निराशेपोटी कारवाई- शरद पवार

अनिल देशमुखांवर होत असलेली कारवाई नैराश्यापोटी होत असून त्याची आम्हाला चिंता नाही, असं शरद पवार म्हणाले आहेत.

अनिल देशमुखांवर निराशेपोटी कारवाई- शरद पवार
SHARES

सीबीआय चौकशी पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी ईडीची छापेमारी देखील झाली. त्यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. अनिल देशमुखांवर होत असलेली कारवाई नैराश्यापोटी होत असून त्याची आम्हाला चिंता नाही, असं शरद पवार (sharad pawar) म्हणाले आहेत.

पुण्यातील नवीन राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयामध्ये सुबोध मोहिते यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश झाला. यावेळी ते बोलत होते.

हाती काही लागलेलं नाही

प्रसारमाध्यमांनी ईडीच्या छाप्याविषयी शरद पवार यांना विचारलं असता ते म्हणाले, ईडी वगैरे आम्हाला नवीन नाहीत आणि अशा प्रकारची चौकशी किंवा छापेमारी होणारे अनिल देशमुख हे काही पहिले नेते नाहीत. याआधीही केंद्रीय तपास यंत्रणांनी अनिल देशमुखांवर कारवाई केली होती. पण माझ्या मते त्यातून त्यांच्या काहीही हाती लागलेलं नाही. अनिल देशमुखांवरील कारवाई ही केंद्रीय यंत्रणांना आलेल्या निराशेतून करण्यात येत आहे. त्यामुळे या कारवाईची आम्हाला यत्किंचितही चिंता वाटत नाही, असं शरद पवार यांनी ठामपणे सांगितलं.

हेही वाचा- संजय राऊतांनी आम्हाला नैतिकतेचे धडे शिकवू नये, चित्रा वाघ यांचं प्रत्युत्तर

विचार दडपण्याचा प्रयत्न

केंद्रातील सत्ताधाऱ्यांनी अनेकदा केंद्रीय तपास यंत्रणांना हाताशी धरून सत्तेचा गैरवापर केल्याचं आपण देशातील अनेक राज्यांत आणि महाराष्ट्रात मागील काही दिवसांत पाहिलेलं आहे. आपल्याला मान्य नसलेले विचार दडपण्याचा प्रयत्न केंद्रीय यंत्रणा वापरून केला जातोय. याआधी असं घडलं नव्हतं. पण केंद्रातील सत्ता यांच्या हातात आल्यानंतर आपण या सगळ्या गोष्टी पाहायला लागलो. मला वाटतं याचा काही परिणाम होणार नाही. लोकं देखील त्याची गांभीर्याने नोंद घेत नाही, असं देखील शरद पवार यावेळी म्हणाले.

दरम्यान, अनिल देशमुख यांच्या नागपूरमधील निवासस्थानी अंमलबजावणी संचालनायलयाने (ईडी) शुक्रवारी सकाळी छापा टाकला. तर याआधी सीबीआयने त्यांची ८ तास चौकशी केली आहे. 

(ncp chief sharad pawar reaction on ED raid at residence of anil deshmukh)

हेही वाचा- माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरी ईडीचा छापा

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा