महाराष्ट्रातील राजकीय गदारोळात शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस मित्रपक्षांच्या महाविकास आघाडीने १६२ आमदारांच्या सह्याचं पत्र राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना सोमवारी दिलं. हे पत्र देतानाच आम्हाला भाजपचं नियमबाह्यपणे स्थापन झालेलं सरकार कोसळलं की सत्ता स्थापन करण्याची संधी मिळावी, अशी मागणीही केली.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, शिवसेना नेते एकनाथ शिंदे, अशाेक चव्हाण, विनायक राऊत, समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी आणि के.सी. पडवी इ. उपस्थित होते.
आज सकाळी राजभवन येते @ShivSena @NCPspeaks व @INCMaharashtra या पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल @BSKoshyari यांची भेट घेऊन सरकार स्थापन करण्यासाठी या तिन्ही पक्षांना निमंत्रित करावे या विनंतीसाठी त्यांना विनंतीपत्र देण्यात आले. pic.twitter.com/cvatmslojt
— NCP (@NCPspeaks) November 25, 2019
हेही वाचा- विश्वासदर्शक ठरावावर सर्वोच्च न्यायालयाचा मंगळवारी अंतिम निर्णय
राज्यपालांना भेटून बाहेर आल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना जयंत पाटील म्हणाले, याआधी भाजपने बहुमत सिद्ध करण्यास पुरेसं संख्याबळ नसल्याने सरकार स्थापन करण्यात असमर्थता दर्शवली होती. आजही त्यांच्याकडे पुरेसं संख्याबळ नाही. त्यामुळे ते बहुमत सिद्ध करू शकत नाही. ते बहुमत सिद्ध करण्यास असमर्थ ठरल्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला सरकार स्थापन करण्याची संधी मिळावी. त्यासाठी आम्ही तिन्ही पक्ष आणि मित्रपक्षांच्या १६२ आमदारांच्या सह्यांचं पत्र राज्यपालांना सोपवलं आहे.
मुख्यमंत्री देेवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली असली, ते विधानसभेत बहुमत सिद्ध करू शकणार नाहीत. कारण त्यांच्याकडे पुरेसं संख्याबळच नाही. आमच्याकडे १६२ आमदारांचं संख्याबळ आहे. बहुमत असलेल्या पक्षांना राज्यपालांनी संधी द्यायला हवी, अशी अपेक्षा शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.
हेही वाचा-
भुजबळ वळवतील का अजितदादाचं मन?
राज्यपालांचा अधिकार 'या' ५ राज्यात भाजपासाठी 'गेमचेंजर' बनला