Advertisement

उसळीत चिकन, कँटीन चालकावर काय कारवाई करणार? अजित पवारांचा सरकारला प्रश्न

लोकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या लोकांना जन्मठेपेची शिक्षा दिली पाहिजे. त्याशिवाय हे लोक सरळ होणार नाहीत. तेव्हा सरकार याप्रकरणी संबंधितांवर नेमकी कुठली कारवाई करणार असा प्रश्न पवार यांनी उपस्थित केला.

उसळीत चिकन, कँटीन चालकावर काय कारवाई करणार? अजित पवारांचा सरकारला प्रश्न
SHARES

विधानभवनाच्या कँटीनमधील मटकीच्या उसळीत चिकनचे तुकडे सापडल्याचा मुद्दा राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी गुरूवारी विधानसभेत उपस्थित केला. लोकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या लोकांना जन्मठेपेची शिक्षा दिली पाहिजे. त्याशिवाय हे लोक सरळ होणार नाहीत. तेव्हा सरकार याप्रकरणी संबंधितांवर नेमकी कुठली कारवाई करणार असा प्रश्न पवार यांनी उपस्थित केला. 

कुणाच्या थाळीत चिकन?

सहकार विभागातील अधिकारी मनोज लाखे गुरूवारी विधान सभेतील कँटीनमध्ये जेवण करण्यास गेले होते. त्यांनी शाकाहारी थाळी मागवली होती. ज्यात मटकीची उसळ देखील होती. या उसळीत चिकनच्या हाडांचे तुकडे सापडल्याने लाखे यांनी विधानसभा सचिव जितेंद्र भोळे यांच्याकडे तक्रार केली. या तक्रारीत त्यांनी कँटीनच्या कंत्राटदारवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.  

कारवाई काय?

या बेजबाबदारपणावर प्रश्न उपस्थित करताना पवार म्हणाले, अधिकारी, कर्मचारी १२-१२ काम करत असतात. त्यांच्या शाकाहारी जेवणात चिकनचे तुकडे सापडणं म्हणजे त्यांच्या भावनेचा, श्रध्देचा अपमान आहे. आरोग्याला धोका उत्पन्न झाल्याने लोकांना कुठल्या हॉटेलमध्ये जावून खावं, काय खावं? असा प्रश्न पडू लागला आहे. कॅन्सरचं प्रमाण वाढल्याने लोकं धास्तावले आहेत. महाबळेश्वर, लोणावळा येथील रसवंतीगृहातला ८० टक्के बर्फ दुषित पाण्यापासून तयार केला जात असल्याची गंभीर बाब पुढं आली आहे. त्यात असे प्रकार घडत असतील, तर ते नक्कीच स्वीकारण्याजाेगे नाहीत. 



हेही वाचा-

पदव्युत्त वैद्यकीय मराठा आरक्षण विधेयक विधानसभेत मंजूर

विधानभवनाच्या कँटीनमधील उसळीत चिकन?



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा