Advertisement

शरद पवारांच्या अध्यक्षपदावरून पायउतार होण्याच्या निर्णयावर अजित पवार म्हणाले...

आता यावर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

शरद पवारांच्या अध्यक्षपदावरून पायउतार होण्याच्या निर्णयावर अजित पवार म्हणाले...
SHARES

राष्ट्रवादीचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad pawar) यांनी अध्यक्ष पदाचा राजिनामा देण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या घोषणेचा सर्वांनाच धक्का बसला आहे. आता यावर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit pawar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

राष्ट्रवादीसाठी शरद पवार कायमच मुख्य राहतील. जो कोणी नवीन अध्यक्ष होईल तो शरद पवारांच्या मार्गदर्शनाखाली काम करेल, अशी माहिती एका नावाजलेल्या वृत्तसंस्थेनी दिली आहे. 

शरद पवार यांच्या राजिनाम्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष कोण होणार याबाबत सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. सध्या अध्यक्षपदाच्या स्पर्धेत सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्या नावाची चर्चा आहे. शरद पवार यांच्या पायउतार होण्याच्या घोषणेनंतर अद्याप नव्या अध्यक्षपदासंदर्भात कुठलीच घोषणा करण्यात आली नाही. 

दरम्यान, शरद पवार अध्यक्षपदावरून राजिनामा देण्याच्या निर्णयला पक्षाच्या कार्यकर्त्यांनी विरोध केला आहे. शरद पवारांनी निर्णय जाहीर करताच कार्यकर्त्यांनी एकच गोंधळ केला. हा निर्णय मागे घेण्याच्या घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या. 



हेही वाचा

शरद पवारांनी 'अशी' केली राष्ट्रवादीची स्थापना

राष्ट्रवादीचे अध्यक्षपद सोडण्याचा शरद पवारांचा निर्णय

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा