मुंबई - पालिकेची निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आली आहे. याच पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्ष कामाला लागलेत. याचीच सुरुवात की काय राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारांची पहिली यादी गुरूवारी जाहीर केली. मात्र यावेळी राष्ट्रवादीला स्वत: पेक्षा शिवसेनेची काळजी वाटत असल्याचं पाहायला मिळालं. राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी भाजपा शिवसेनेला महाराष्ट्रातून संपवण्याचा प्रयत्न करत असल्याचं सांगितलं. तसेच शिवसेना सत्तेसाठी लाचार असल्याने बाहेर पडत नसल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.