भीमा कोरेगाव प्रकरणाचे पडसाद मंगळवारी दिवसअखेर मंत्रालयात उमटले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरील मुख्यमंत्री कार्यालयाबाहेर निदर्शने करत जोरदार घोषणाबाजी केली.
सायंकाळी ५:३० च्या सुमारास पोलिसांचा कडक बंदोबस्त असतानाही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी गनिमी कावा करीत हातात सरकार आणि मुख्यमंत्र्यांचे फलक उंचावत निदर्शने केली. ही निदर्शने मंत्रालयातील सहाव्या मजल्यावर असणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाबाहेर केली. सरकारच्या आणि मुख्यमंत्र्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
दलित विरोधी मुख्यमंत्री चले जाव, मुख्यमंत्री मुर्दाबाद, डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो अशा घोषणा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दिल्या. घोषणा देणाऱ्या राष्ट्रवादीच्या या कार्यकर्त्यांना बंदोबस्तासाठी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
दरम्यान आंदोलनकर्त्या युवकांचं नाव कळू शकलेले नाही. त्यांना मारिन ड्राइव्ह पोलीस स्टेशनला घेऊन गेले असून तेथे त्यांच्यावर पुढील कारवाई होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा-
Live Update: भीमा-कोरेगाव दगडफेकीचे मुंबईत पडसाद, बेस्ट फोडल्या