राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) चे आमदार रोहित पवार (ROHIT PAWAR) यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (Maharashtra Navnirman Sena) नवनिर्वाचित नेते अमित ठाकरे यांना शुभेच्छा दिल्या आहेत. रोहित पवार हे राज्यातील तरूण नेत्यांपैकी एक मानले जातात. रोहित पवार हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (SHARAD PAWAR) यांचे नातू आहेत. अमित ठाकरे (AMIT THACKERAY) यांना शुभेच्छा देताना रोहित पवार म्हणाले की, आपली विचारधारा वेगळी असली तरी जेव्हा राज्याच्या हिताची वेळ येईल तेव्हा आम्ही मित्राप्रमाणे वागू.
रोहित पवार (ROHIT PAWAR) यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर ट्वीट करून म्हटलं की, अमित राज ठाकरे (AMIT THACKERAY) यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते म्हणून निवडल्याबद्दल अभिनंदन आणि त्यांच्या भावी कार्यासाठी शुभेच्छा. आमचे राजकीय मतभेद आहेत. मात्र, जिथे लोक आणि राज्याच्या हिताची वेळ येईल तेव्हा आम्ही वैयक्तिक पातळीवर मित्र म्हणून एकमेकांना नेहमी सहकार्य करू.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे (raj thackeray) यांचा मुलगा अमित ठाकरे (AMIT THACKERAY) अधिकृतपणे राजकारणामध्ये सहभागी झाले आहेत. मनसे नेते बाळा नांदगावकर (bala nandganvkar) यांनी गुरुवारी गोरेगाव येथील नेस्को मैदानात झालेल्या मनसेच्या एक दिवसीय अधिवेशनात अमित ठाकरे यांना नेतेपद देण्याची घोषणा केली. यावेळी अमितची आई शर्मिला ठाकरे (sharmila thakceray) आणि त्यांची पत्नी मिताली ठाकरे (mitali thakceray) उपस्थित होत्या. या अधिवेशनाच मनसेच्या नवीन ध्वजाचे लोकार्पणही करण्यात आले.
हेही वाचा -