Advertisement

राष्ट्रवादी होणार काँग्रेसमध्ये विलीन, ही तर अफवा- शरद पवार

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या भेटीला गेल्याने राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस पक्षात विलीन होणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

राष्ट्रवादी होणार काँग्रेसमध्ये विलीन, ही तर अफवा- शरद पवार
SHARES

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या भेटीला गेल्याने राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस पक्षात विलीन होणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. परंतु या चर्चेला अद्याप कुणाकडूनही दुजोरा मिळू न शक्यता ही चर्चा निव्वळ अफवा असल्याचं राजकीय तज्ज्ञांचं म्हणणं आहे. तर पवार यांनी बैठकीत राहुल यांच्या अध्यक्षपदाबाबत चर्चा झाल्याचं स्पष्ट केलं आहे.  

विरोधी पक्षनेतेपदासाठी

लोकसभा निवडणुकीत भाजपप्रणित एनडीएने काँग्रेसचा दारूण पराभव केला आहे. भाजपाने एकहाती ३०३ जागा जिंकल्या असून एनडीएला जागा ३५२ वर जाऊन पोहोचल्या आहेत. काँग्रेसला या निवडणुकीत अवघ्या ५२ जागा मिळवता आल्याने त्यांना विरोधी पक्षनेतेपदही मिळणं मुश्कील झालं आहे. कारण लोकसभेत विरोधपक्षनेतेपद मिळवण्यासाठी किमान ५५ जागा असणं आवश्यक आहे. सध्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे ५ खासदार असून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन झाल्यास काँग्रेसचं संख्याबळ ५७ खासदारांवर जाईल. परिणामी काँग्रेसला इतर विरोधी पक्षांकडे हात पसरण्याची गरज उरणार नाही. 

राहुल यांची मनधरणी

तर, दुसऱ्या बाजूला काँग्रेसच्या दारूण पराभव जिव्हारी लागल्याने राहुल गांधी काँग्रेस अध्यक्षपद सोडण्यावर अजूनही ठाम असल्याचं म्हटलं जात आहे. परंतु पक्षात सध्यातरी त्यांची जागा घेणारा कुणीही नेता दिसत नसल्याने राहुल यांनी अध्यक्षपद सोडू नये, यासाठी त्यांची मनधरणी करण्यासाठी काँग्रेस नेत्यांची रांग लागली आहे. त्यातच पवार यांनीही त्यांची भेट घेऊन अध्यक्षपदावर कायम राहण्याची विनंती केल्याची प्रतिक्रिया पवार यांनी दिली. महाराष्ट्रातील सद्यस्थितीवरही चर्चा केल्याची माहिती त्यांनी दिली. 

राज्यात राष्ट्रवादीच्या जागा काँग्रेहून अधिक असताना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याचा विचारच कसा करेल, असा प्रश्न राजकीय तज्ज्ञ उपस्थित करत आहेत.   

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारूण पराभव झाला आहे. लोकसभेत विरोधी पक्षनेतेपद मिळवण्या इतपतही काँग्रेसला जागा मिळालेल्या नाहीत. त्यामुळे राष्ट्रवादीला काँग्रेसमध्ये विलीन केल्यास विरोधी पक्षनेतेपद मिळवण्याएवढ्या जागा होऊ शकतील.



हेही वाचा-

शिवसेनेला हवं रेल्वे मंत्रालय?, राज्यातील 'या' खासदारांना मिळणार मंत्रीपद

महाआघाडीची तयारी? राज ठाकरे, शरद पवार यांच्यात ४५ मिनिटे गुफ्तगू



Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा