Advertisement

दिशा सॅलियन प्रकरणात सचिन वाझेंची एन्ट्री? नितेश राणेंचं ट्वीट

भाजपा आमदार नितेश राणे यांनी आता काही ट्वीट करुन सचिन वाझेचा सहभाग होता का असा प्रश्न उपस्थित केला आहे.

दिशा सॅलियन प्रकरणात सचिन वाझेंची एन्ट्री? नितेश राणेंचं ट्वीट
SHARES

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन सुशांत सिंहची मॅनेजर दिशा सॅलियनच्या मृत्यूसंबंधी बोलताना काही गंभीर आरोप केले होते.

दिशा सॅलियनची हत्या करण्यात आली असून हत्येआधी बलात्कार करण्यात आल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला होता.

त्यानंतर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांना पत्र लिहिलं असून आयोगाने पोलिसांनी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

यादरम्यान भाजपा आमदार नितेश राणे यांनी आता काही ट्वीट करुन सचिन वाझेचा सहभाग होता का असा प्रश्न उपस्थित केला आहे.

“मालवणी पोलिसांची भूमिका पहिल्या दिवसापासूनच संशयास्पद राहिली आहे. आणि आता त्यांना दिशा सॅलियन प्रकरणात अहवाल सादर करण्याचा आदेश देण्यात आला आहे. दिशासोबत राहणारा आणि ८ तारखेच्या रात्री उपस्थित असणारा रोहित राय पुढे येऊन काहीच का बोलत नाही?,” असा सवाल नितेश राणेंनी विचारला आहे.

“मुंबईच्या महापौरांनी महिला आयोग आणि त्यानंतर मालवणी पोलिसांना पत्र लिहून अहवाल सादर करण्यास सांगितलं आहे. याचा अर्थ राज्य सरकारकडून ८ जूनच्या रात्री काहीच झालं नाही अंस दाखवण्यासाठी मोठी तयारी सुरू आहे. चला किमान ते आपली कबर खोदत आहेत याचा आनंद आहे,” असं नितेश राणे म्हणाले आहेत.

“दिशाला ८ तारखेच्या रात्री काळ्या मर्सिडीजमधून तिच्या मालाडच्या घरी नेण्यात आलं. सचिन वाझेकडेही काळी मर्सिडीज आहे जी सध्या तपास यंत्रणांकडे आहे. ही तीच कार आहे का? ९ जूनला त्याला पुन्हा पोलीस खात्यात रुजू करण्यात आलं. संबंध?,” अशी शंका नितेश राणेंनी उपस्थित केली आहे.

“मालवणी पोलिसांनी योग्य तपास न केल्यानं हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आलं होतं. बरोबर ना? आणि आता याच पोलिसांना महिला आयोगानं अहवाल सादर करण्यास सांगितलं आहे? हे किती योग्य आहे? नेमकं कोणाला वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे?,” अशी विचारणा नितेश राणेंनी केली आहे.

काही दिवसांपूर्वी नारायण राणे यांनी सुशांतसिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी खासदार विनायक राऊत यांना इशारा दिला होता.

“खासदार विनायक राऊत यांच्यासाठी खास बातमी... लवकरच सुशांतसिंग व सामुदायिक बलात्कार करून तिची हत्या केली. त्यांचीही चौकशी परत होईल एवढेच नाही तर मातोश्रीच्या चौघांवर ईडीची नोटीस तयार असल्याचे कळाले. विनायक राऊत हे घडल्यावर आपले “बॉस” आणि आपण कुठे धावणार?,” असं राणेंनी म्हटले होते.



हेही वाचा

'काँग्रेसनं सुरू केलेल्या नौटंकीचा शेवट आम्ही मुंबईत करु'- मनोज कोटक

पालिकेची नारायण राणेंना नोटीस, जुहूतल्या बंगल्याची पाहणी

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा