Advertisement

नो मराठी, नो ॲमेझाॅन, मनसेचे मुंबईत पोस्टर

अॅमेझॉनवर मराठी भाषेचा वापर व्हावा यासाठी मनसे आता चांगलीच आक्रमक झाली आहे. मनसेकडून नो मराठी, नो अ‍ॅमेझॉन’ असा मजकूर असलेले फलक मुंबईत लावण्यात आले आहेत.

नो मराठी, नो ॲमेझाॅन, मनसेचे मुंबईत पोस्टर
SHARES

अॅमेझॉनवर मराठी भाषेचा वापर व्हावा यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) आता चांगलीच आक्रमक झाली आहे. मनसेकडून नो मराठी, नो अ‍ॅमेझॉन’ असा मजकूर असलेले फलक मुंबईत लावण्यात आले आहेत. वांद्रे पूर्व, वांद्रे पश्चिम, माहीम, अंधेरी आणि रेक्लमेशनच्या परिसरातील रस्त्यांवर मनसेचे हे फलक दिसत आहेत. मनसेचे नेते अखिल चित्रे यांच्याकडून हे फलक लावण्यात आले आहेत.

मनसेने याआधी अ‍ॅमेझॉनच्या मुंबईतील कार्यालयाबाहेर पोस्टर झळकावले होते. तुम्हाला महाराष्ट्रात आमची भाषा मान्य नाही. मग आम्हाला महाराष्ट्रात तुम्ही मान्य नाही, अशी तंबी मनसेने दिली होती.

याची दखल अ‍ॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझॉस यांच्या प्रतिनिधींनी घेतली होती. जेफ बेझॉस यांना तुमचा ईमेल मिळाला आहे. अ‍ॅमेझॉन अ‍ॅपबाबत तुम्हाला आलेल्या अनुभवाबद्दल आम्ही दिलगीर आहोत. संबंधित टीमला आम्ही याची माहिती दिल्याचा ई-मेल अ‍ॅमेझॉनकडून पाठवण्यात आला होता. त्यानंतर अ‍ॅमेझॉनचं शिष्टमंडळ मुंबईत आलं होतं.

तसंच काही दिवसांपूर्वीच अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट अ‍ॅपमध्ये मराठी भाषेचा समावेश करण्याच्या मागणीसाठी मनसेने या कंपन्यांच्या ऑफिसवर धडक दिली होती. मुंबईच्या बीकेसी परिसरात या दोन्ही कंपन्यांची कार्यालये आहेत. सात दिवसांत मराठी भाषेचा पर्याय न ठेवल्यास स्टाफला लाथ मारुन बाहेर काढण्याची धमकी ही यावेळी मनसेने दिली होती.



हेही वाचा -

मिठी नदीच्या साफसफाईसाठी केंद्राकडून एकही दमडी मिळाली नाही, RTI मधून खुलासा

मुंबईच्या गल्लीबोळात राहणार आता पोलिसांच्या तिसऱ्या डोळ्याची नजर



Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा