Advertisement

नॉटरिचेबल असलेल्या एकनाथ शिंदेंनी केलं ट्विट, म्हणाले शिवसेना...

एकनाथ शिंदे यांनी ट्विटरच्या माध्यमातून जनतेला संदेश दिला आहे.

नॉटरिचेबल  असलेल्या एकनाथ शिंदेंनी केलं ट्विट, म्हणाले शिवसेना...
SHARES

महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ सुरू असताना अखेर एकनाथ शिंदे यांनी ट्विटरच्या माध्यमातून जनतेला संदेश दिला आहे.

आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत... बाळासाहेबांनी आम्हाला हिंदुत्वाची शिकवण दिली आहे.. बाळासाहेबांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण यांच्याबाबत आम्ही सत्तेसाठी कधीही प्रतारणा केली नाही आणि करणार नाही, असं त्यांनी म्हटलं आहे. 

एकनाथ शिंदे आता आनंद दिघे यांच्या नावाने स्वत:ची संघटना स्थापन करू शकतात. त्यातून भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारला पाठिंबा देऊ शकतात.

एकनाथ शिंदे यांनी ट्वीटनुसार त्यांनी हिंदुत्वाची भूमिका मांडली असून काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सरकार चालवण्यास अनुत्सुक असल्याचे संकेत दिले आहेत. 

दरम्यान, शिवसेनेत झालेल्या बंडाळीवर महाविकास आघाडीमधील राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचेही लक्ष आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी चर्चा केली. त्याशिवाय, अजित पवार यांच्या दालनात राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी अजित पवार यांच्यासोबत चर्चा केली. 

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा