Advertisement

पालघरमध्ये फेरमतदान नाहीच- निवडणूक अधिकारी

पालघर लोकसभा पेाटनिवडणुकीच्या मतदानाच्या वेळेत ईव्हीएम यंत्रात बिघाड झाल्याच्या अनेक घटना आढळून आल्या. ही सर्व यंत्रे बदलण्यात आल्याची माहिती निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

पालघरमध्ये फेरमतदान नाहीच- निवडणूक अधिकारी
SHARES

पालघर लोकसभा मतदार संघातील पोटनिवडणुकीदरम्यान २२ ठिकाणच्या मतदान केंद्रातील ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानं मतदान प्रक्रिया रखडली. मात्र नादुरुस्त यंत्रे बदलण्यात आली असून मतदान प्रक्रिया शांततापूर्ण वातावरणात सुरू असल्याची माहिती राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली. सोबतच या ठिकाणी फेरमतदान होणार नाही, असंही निवडणूक अधिकाऱ्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं.


ईव्हीएम मशीन बदलल्या

काही वेळा तांत्रिक कारणांमुळे यंत्रे नादुरूस्त होण्याच्या समस्या उद्भवते. ही यंत्रे बदलण्यासाठी राखीव यंत्रांचीही तरतूद करण्यात आलेली असते. पालघर पेाटनिवडणुकीच्या मतदानावेळीही काही ईव्हीएम यंत्रात बिघाड झाला. मात्र आता ही यंत्र शिष्टाचाराप्रमाणे बदलण्यात आली आहेत, अशीही माहिती निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी दिली.


ज्या मतदानकेंद्रावर EVM मशीनमध्ये बिघाड झाला त्या सर्व मतदान केंद्रावर फेरमतदान घ्यावं आणि मतमोजणीवेळी VVPATस्लीपचीही मोजणी करावी. 

- खा. अशोक चव्हाण, अध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी 



कोठेही निवडणूक रद्द होणार नाही वा पुढे ढकलली जाणार नाही. तांत्रिक बिघाड झालेल्या ठिकाणी पर्यायी यंत्र उपलब्ध करून देण्यात आली आहेत. प्रत्येकाला मतदानाचा हक्क असून या हक्कापासून कुणालाही वंचित ठेवलं जाणार नाही. ६ वाजेपर्यंत मतदान करता येईल. तांत्रिक अडचणींमुळे उशिरा मतदान सुरू झालेल्या ठिकाणी वेळ दिला जाणार आहे. शेवटच्या मतदाराला चिट्ठी देऊन मतदान करता येणार आहे.
-शिरीष मोहोड, अवर सचिव उपमुख्य, निवडणूक आयोग





हेही वाचा -

पालघर पोटनिवडणूक, अनेक ठिकाणी ईव्हीएममध्ये बिघाड

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा