Advertisement

वनगा कुटुंबियांचा शिवसेनेत प्रवेश?


वनगा कुटुंबियांचा शिवसेनेत प्रवेश?
SHARES

पालघरचे खासदार चिंतामण वनगा यांच्या मृत्यूनंतर होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी त्यांच्या कुटुंबियांना भाजपने दुर्लक्ष केल्यामुळे अाता वनगा कुटुंबियांनी 'मातोश्री' गाठली अाहे. वनगा कुटुंबीयांनी आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. त्यामुळे अाता वनगा कुटुंबियही लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे समजते. 



भाजपने सोडलं वाऱ्यावर

खासदार चिंतामण वनगा यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबियांना भाजपने वाऱ्यावर सोडलं अाहे. पालघर पोटनिवडणुकीसाठी वनगा कुटुंबियांकडे भाजपनं दुर्लक्ष केल्याची खंत त्यांच्या कुटुंबियांनी बोलून दाखवली. अापण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अाणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची फोनवरून तसेच त्यांना एसएमएस करून भेट मागितली होती. मात्र कुणाकडूनही अाम्हाला प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळेच अाम्ही मातोश्रीवर अाल्याचे चिंतामण वनगा यांच्या मुलाने सांगितले. 



भाजपला देणार सोडचिठ्ठी

भाजप अाणि वनगा कुटुंबिय यांचे अतूट नाते अाहे. मात्र भाजपकडून दुर्लक्ष होत असल्यामुळे वनगा कुटुंबिय अाता भाजपला सोडचिठ्ठी देण्याच्या विचारात अाहेत. मात्र वनगा कुटुंबिय अाता शिवसेनेत प्रवेश करणार का, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला अाहे.


हेही वाचा -

राज ठाकरेंनी घेतलं आदिवासी पाड्यात जेवण...

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा